महत्वाच्या बातम्या

 सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू दिल्या जाणार नाही : माजी मंत्री राजकुमार बडोले


- शासकीय योजनांचे जास्तीत जास्त लाभार्थी तयार करा, कार्यकर्त्यांना आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / सडक अर्जुनी : अर्जुनी विधानसभा क्षेत्रातील पळसंगाव / राका, ता. सडक अर्जुनी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते संपन्न झाले. यात जलजीवन मिशन अंतर्गत पाईपलाईन, सिमेंट रस्ता बांधकाम, मनरेगा अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्ते बांधकाम, १५ व्या वित्त आयोगातून सिमेंट रस्त्याचे बांधकाम, ग्रामपंचायत निधीतून विविध विकास कामे तसेच मनरेगा अंतर्गत पांदन रस्त्यांच्या कामाचा समावेश आहे. यावेळी गावाच्या विकासासाठी कटिबद्ध असून या पुढे देखील विविध योजनेमधून गावासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे तसेच सर्वांगीण विकासाठी निधी कमी पडू दिल्या जाणार नाही अशी ग्वाही माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी ग्रामस्थांना भूमिपूजन कार्यक्रम दरम्यान दिली. सोबतच शासनाच्या योजना प्रभावी पद्धतीने लागू करण्यासाठी भारतीय जनता पार्टी च्या पदाधिकाऱ्यानी आपल्या गावात जास्तीत जास्त लाभार्थी तयार करण्याचे आवाहन देखील माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या कविता रंगारी, पंचायत समितीचे उपसभापती शालिंदर कापगते, माजी जि.प.सभापती राजेश नंदागवळी, पं.स.सदस्या सपना नाईक, संरपच भारती लोथे, उपसरपंच सुनिल चांदेवार, अशोक कापगते, ग्रामपंचायत सदस्य पुजा कापगते, कुंदा सावरकर, सविता मल्लेवार यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.





  Print






News - Gondia




Related Photos