बिबट्याला पळविताना केला प्रतिहल्ला, कुरखेडा तालुक्यातील खपरी येथे तीन जण जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / कुरखेडा :
  आज १९ जानेवारी रोजी सकाळी गावात आलेल्या बिबट्याला  पीटाळून लावण्याकरीता  एकत्र येत लाठी काठी घेत  पाठलाग केला . बिबट एका गुहेत दडून बसला होता.  यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने गावकऱ्यांवर प्रतिहल्ला चढविल्याने तिन गावकरी जखमी झाले . मात्र इतर गावकरी मदतीला धाऊन गेल्याने बिबट्याने तिथून पळ काढला.  शामराव मडावी , सुभाष जगन भोयर रा .खापरी व सुभाष देवनाथ करपते रा.चिनेगाव अशी जखमींची नावे आहेत.  या घटनेने परिसरात भीती निर्माण झाली आहे. 
या घटनेत  श्यामराव मडावी याच्या  पायाला व सुभाष करपते याच्या  हाताला दुखापत झाली आहे . तर सुभाष भोयर याला किरकोळ जखम असल्याने गावीच उपचार करण्यात आला.  दोन महिन्यांपूर्वी बिबट्याने सोनसरी नजीकच्या मोहंगाव येथील एका इसमास ठार केले होते . या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली असून सोनसरी परिसरात असलेल्या या बिबट्याचा  वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात आली आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-19


Related Photos