महत्वाच्या बातम्या

 पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात इसम ठार : सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील घटना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : ब्रह्मपुरी वन विभाग ब्रह्मपुरी, अंतर्गत येणाऱ्या सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील कच्चेपार बीट-२ दोन कक्ष क्रमांक २५४ मध्ये मृतक श्रीकृष्ण सदाशिव कोठेवार (५१) राहणार पळसगाव (जाट) याला सकाळी ८:३० वाजता च्या दरम्यान वाघाने हमला करून ठार केल्याची घटना घडली.

माहितीनुसार, मृतक श्रीकृष्ण सदाशिव कोठेवार हा आपल्या नेहमीच्या काही साथीदारांसोबत जंगलातील कच्चेपार बीटा मध्ये नेहमीप्रमाणे पहाटेच्या सुमारास काड्या तोडायला गेला असता काड्या गोळा करताना चालत चालत जंगलामधील नाल्यालगत पाण्याजवळ बसलेल्या वाघाच्या अचानक समोर गेल्यामुळे  अचानक वाघाने हमला करून श्रीकांत कोठेवार यास ठार केले. यावेळेस घटनास्थळाजवळ असलेल्या साथीदारांनी मात्र आरडा ओरड करून वाघाला हाकलण्याचा प्रयत्न केला मात्र वाघाने मृतदेह १०० मीटर पर्यंत उचलून नेला. तोपर्यंत श्रीकांत हा मृत पावलेला होता. 

सदर घटनेची माहिती वनविभागाला देताच सिंदेवाहीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहाय्यक सिंदेवाही, के.डी. मसराम ही आपली चमू घेऊन घटनास्थळी दाखल झाले. यावेळेस चौधरी वनरक्षक कच्चेपार बिट, चहांदे वनरक्षक डोंगरगाव बीट, पंडित मेकेवार वनरक्षक आलेवाही, फुलझले वनरक्षक सिंदेवाही बिट, तोडसाम कारगाटा वनरक्षक व स्वाब संस्थेचे जिवेश सयाम, शुभम निकेशर, कैलास बोरकर, गोपाल कुंभले, यश कायरकर, मिनेश कुंभले, आदी स्वाब संस्थेचे सदस्य हे यावेळी घटना स्थळी उपस्थित होऊन शिंदेवाही पोलिसांना घटनेची माहिती दिली व मोक्का पंचनामा करून  पोलिसांनी सिंदेवाही येथे ग्रामीण आरोग्य केंद्रात शव विच्छेदन करन्याकरिता आनण्यात आले.

पीडित परिवाराला वन विभागातर्फे तात्काळ मदत म्हणून २५ हजार रुपये देण्यात आले.

या परिसरात वाघांचा वावर असल्यामुळे लोकांनी जंगलात सरपण गोळा करायला किंवा कुठल्याही प्रकारच्या कामानिमित्य जंगलात जाऊ नये. असे वन विभागामार्फत परिसरातील लोकांना सूचना देण्यात येत आहेत. घटनास्थळी कॅमेरा लावून घटने करता कारणीभूत असलेल्या वाघाची ओळख पटन्याकरीता हालचाली कड़े लक्ष ठेवण्यात येत आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos