महत्वाच्या बातम्या

 अभाविपच्या घंटानाद आंदोलनास भरगच्च यश : विद्यार्थ्यांच्या आक्रोश्यासमोर झुकले विद्यापीठ प्रशासन


- शक्ती केराम : अभाविप विदर्भ प्रदेश मंत्री


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 20 एप्रिल रोजी करण्यात आलेल्या घंटानात आंदोलनाला यश ज्यामध्ये व्यवस्थापन परिषदेचे बैठक तीन तास रोखून ठेवत अभावीप विदर्भ प्रांत मंत्री शक्ती केराम यांनी यावेळी भूमिका ठेवली जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत ही बैठक आम्ही होऊ देणार नाही व इथून एकही विद्यार्थी उठणार नाही अशी घोषणा केली होती. या घोषणे समोर विद्यापीठ प्रशासनाला झुकावे लागले व अभावीपच्या सर्व मागण्या पूर्ण कराव्या लागल्यात ज्यामध्ये 8 मे रोजी कुलगुरू महोदयानी विद्यापीठातील संबधीत अधिकाऱ्यांन सोबत अभाविप च्या पदाधिकाऱ्यांची बैठक लावून पूर्ण करण्यात आलेल्या मागण्या ह्या त्यांच्या समोर मांडल्यात पूर्ण झालेल्या मागण्या पुढील प्रमाणे.


1) विद्यापीठाद्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचे मूल्यमापन हे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाप्रमाणे स्त्री स्तरीय परीक्षक समीक्षक व मुख्य समीक्षक नमुना आदर्श उत्तर पत्रिका तयार करून घेण्यात येणार आहे. 2) सत्र 2023 -24 पासून विद्यापीठातील क्रीडा विभागामधील ज्या विद्यार्थिनी क्रीडा स्पर्धेसाठी विद्यापीठाचे नेतृत्व करण्यासाठी या बाहेर जाणार आहेत अशा विद्यार्थ्यांनी सोबत महिला व्यवस्थापक व प्रशिक्षक पाठवण्यात येणार आहेत
3) विद्यापीठांमध्ये येणारे विद्यार्थ्यांची हेडसांड होते विद्यार्थ्यांना बऱ्याच योजनांची माहिती नसते व विद्यापीठातील वेगवेगळ्या विभागाचे सुद्धा माहिती नसते तर विद्यापीठाद्वारे विविध विभागांची माहिती देण्याकरिता विद्यार्थी सुविधा केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
4 विद्यापीठाअंतर्गत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता वीर बाबुराव शेडमाके कमवा व शिकाय योजना सुरू करण्यात आली आहे जे विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करतील अशा सर्व विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
5) गोंडवाना विद्यापीठाच्या नवीन इमारतीमध्ये वेगवेगळ्या विभागांची माहिती देणारा नकाशा सुद्धा लावण्यात येणार आहे.
6) विद्यार्थ्यांशी संबंधित असणाऱ्या विद्यापीठातील वेगवेगळी माहिती हे आता विद्यार्थ्यांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएस द्वारे कळवण्यात येणार आहे.
7) जे विद्यार्थी नापास होतात पूर्णपरीक्षे करिता फॉर्म भरतात तेव्हा अश्या विद्यार्थ्यान कडून सरसकट पूर्ण फी घेतली जात असे अशा सर्व विद्यार्थ्यांना आता आनंदाची बातमी या पुढे विषय निहाय विद्यार्थ्यांकडून ते शुल्क घेण्यात येणार.
8) रिचेकिंग मध्ये जे विद्यार्थी पास होतात अशा सर्व विद्यार्थ्यांना त्यांचं परीक्षा शुल्क परत मिळणार.
9) विद्यार्थ्यांचा अपघात विमा हापूर्वी पंचवीस हजार होता तें आता पंचवीस हजारा पासून एक लाखापर्यंत त्यांना मिळणार.
10) गोंडवाना विद्यापीठात अंतर्गत संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधन करण्याकरिता आठ हजार रुपये अधिछात्र वृत्ती देण्यात येणार. जे की आत्तापर्यंत कुठल्याच संशोधक विद्यार्थ्यांना दिली जात नव्हती.
11) अभाविपच्या मागणी वरुन विद्यापीठांमध्ये उभारण्यात येणार जनजाती क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांचा पूर्णाकृती पुतळा.


इतकेच नव्हे तर गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालय मध्ये जाऊन समस्या शोध अभियान रबावणार, प्रत्येक महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या समस्या लवकरात - लवकर कशा दूर होतील यासाठी प्रत्येक महाविद्यालय मध्ये निवेदन देऊन त्या समस्या दूर करू अन्यथा समस्या दूर न झाल्यास एक मोठे आंदोलन उभे करू असा इशारा विदर्भ प्रांत मंत्री शक्ती केराम यांनी दिला.





  Print






News - Gadchiroli




Related Photos