महत्वाच्या बातम्या

 विद्यार्थ्यांनी दिली जवाहर नवोदय परीक्षा : पोलिसांचा चोख बंदोबस्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / कोरची : जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता सहावी मध्ये प्रवेश घेण्यासाठी दरवर्षी वर्ग पाचवी उत्तीर्ण व वर्ग पाचवी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा घेण्यात येते. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा वर्ग सहावी मध्ये प्रवेश प्रक्रिया घेण्याकरिता परीक्षा घेण्यात आली. सदर परीक्षा ही श्रीराम विद्यालय कोरची व पार्वताबाई विद्यालय कोरची अशा दोन केंद्रामध्ये घेण्यात आली.

नवोदय विद्यालयाची प्रवेश संख्या जिल्ह्याकरिता निर्धारित असून एकूण ८० जागांसाठी सदर परीक्षा घेतली जाते. ज्यामध्ये ७५ टक्के विद्यार्थी हे ग्रामीण क्षेत्रातून व २५ टक्के विद्यार्थी हे शहरी क्षेत्रातून घेतले जातात.

नवोदय विद्यालय प्रवेश प्रक्रियेमध्ये एकूण ८० प्रश्न १०० गुणांचे विचारण्यात आले होते. सदर परीक्षेचा कालावधी दोन तासाचा निर्धारित केला असून यामध्ये बौद्धिक क्षमता चाचणी, अंकगणित चाचणी आणि भाषा चाचणीचे प्रश्न विचारण्यात आले होते.

३०९ पैकी २९८ विद्यार्थी होते उपस्थित

सदर परीक्षेमध्ये कोरची तालुक्यातील एकूण ३०९ विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. परंतु सदर परीक्षेत ११ विद्यार्थी गैरहजर होते. श्रीराम विद्यालय कोरची येथे १४१ विद्यार्थ्यांपैकी १३६ विद्यार्थी व पार्वताबाई विद्यालय येथे १६८ पैकी १६२ विद्यार्थी उपस्थित होते.

पोलिसांचा चोख बंदोबस्त

परीक्षा केंद्रात कुठलीही अनुचित घटना घटू नये, याकरिता परीक्षा केंद्रात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.





  Print






News - Gadchiroli




Related Photos