महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


३० एप्रिल महत्वाच्या घटना

१४९२ : स्पेनने ख्रिस्तोफर कोलंबस यांना त्यांच्या शोधाकार्यासाठी कमीशन दिले.

१६५७ : शिवाजी महाराजांनी मोगलांच्या ताब्यात असलेल्या जुन्नर शहरावर हल्ला करून ते लुटले.

१७८९ : जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे पहिले निवडलेले राष्ट्राध्यक्ष बनले.

१९३६ : वर्ध्याजवळ महात्मा गांधींनी सेवाग्राम आश्रम स्थापन केला.

१९७७ : ९ राज्यांमधील विधानसभा बरखास्त झाली आणि जनसंघ, समाजवादी पक्ष, संघटना काँग्रेस आणि भारतीय लोकदल या पक्षांनी जनता पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

१९८२ : कलकत्त्यात बिजान सेतु हत्याकांड घडले.

१९९५ : उत्तर आयर्लंडला भेट देणारे बिल क्लिंटन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले.

१९९६ : थेऊर येथील श्री चिंतामणी मंदिराच्या आवारातील श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांच्या स्मृ्तिमंदिराचे उद्‍घाटन झाले.

२००९ : ख्रायस्लर कंपनीने दिवाळखोरी घोषित केली.

३० एप्रिल जन्म

१७७७ : जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ कार्ल फ्रेड्रिक गाऊस यांचा जन्म. (मृत्यू: २३ फेब्रुवारी १८५५)

१८७० : भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक धुंडिराज गोविंद ऊर्फ दादासाहेब फाळके यांचा जन्म. (मृत्यू: १६ फेब्रुवारी १९४४)

१९०९ : माणिक बंडोजी इंगळे ऊर्फ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑक्टोबर १९६८)

१९१० : साहित्य अकादमी पुरस्कार विजेते तेलुगू कवी आणि गीतकार श्रीरंगम श्रीनिवास राव ऊर्फ श्री श्री राव यांचा जन्म. (मृत्यू: १५ जून १९८३)

१९२१ : जीपीएस चे सहसंशोधक रॉजर एल. ईस्टन यांचा जन्म. (मृत्यू: ८ मे २०१४)

१९२६ : मराठी संगीतकार श्रीनिवास खळे यांचा जन्म. (मृत्यू: २ सप्टेंबर २०११)

१९८७ : भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा यांचा जन्म.

३० एप्रिल मृत्यू

१०३० : तुर्कीच्या गझनवी साम्राज्याचा शासक मोहंमद गझनी यांचे निधन. (जन्म: २ ऑक्टोबर ९७१)

१८७८ : साक्षात्कारी सत्पुरुष व दत्तावतारी स्वामीमहाराज अक्‍कलकोट यांनी समाधी घेतली.

१९१३ : व्याकरणकार आणि निबंधकार मोरो केशव दामले यांचे निधन. (जन्म: ७ नोव्हेंबर १८६८)

१९४५ : जर्मनीचे नाझी हुकूमशहा अ‍ॅडॉल्फ हिटलर यांनी आत्महत्या केली. (जन्म: २० एप्रिल १८८९)

२००१ : प्रयोग परिवार या संकल्पनेचे प्रवर्तक, गणितज्ञ आणि कृषी शास्त्रज्ञ श्रीपाद अच्युत दाभोळकर यांचे निधन. (जन्म: २१ ऑगस्ट १९२४)

२००३ : मराठी साहित्यिक वसंत पोतदार यांचे निधन. (जन्म: २० नोव्हेंबर १९३९ – आष्टी, उस्मानाबाद)

२०१४ : भारतीय चित्रकार आणि सेट डिझायनर खालिद चौधरी यांचे निधन. (जन्म: २० डिसेंबर १९१९)





  Print






News - todayspecialdays




Related Photos