महत्वाच्या बातम्या

 सफर ए शहादत सप्ताहा निमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

शहर प्रतिनिधी / देसाईगंज : येथिल पविञ गुरुद्वार येथे आज रक्तदान शिबीरासह भजन, किर्तन व डॉ. निर्मलसिंग टुटेजा यांचे पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पंजाब प्रांतातिल चमकौर युद्ध संग्रामात सिख संप्रदायाचे धर्मगुरु यांच्या दोन पुञांना मुघलांविरुद्ध लढतांना विरगती प्राप्त झाली. त्यांच्या वयाने लहान असलेल्या दोन मुलांना व गुरुगोविंदसिंग यांच्या आईला मोघलांनी कैद केले व त्यांना मुस्लिम धर्म स्विकारण्यासाठी दबाव टाकला, माञ वयाने ६ व ९ वर्षाच्या बालकांनी व त्यांच्या आजींनी धर्मपरिवर्तनास ठाम नकार दिला, तेव्हा मुघलांनी या तिघांनाही भिंतीत दफन केले. गुरु गोविंद सिंगांनी आपले चारही पुञ मोघलांविरुद्ध लढतांना गमावले. त्यांची आठवण व त्यांच्या विरगतिला पुण्यस्मरण म्हनुण सिख समुहाय दरवर्षी २६ डिसेंबर हा दिवस सफर ए शहादत म्हणून  पाळतो. देसाईगंज येथिल सिंग सभेच्या माध्यमातुन पविञ गुरुद्वार येथे २१ डिसेंबर ते २६ डिसेंबर या सप्ताहात दररोज गुरु नाम जप, किर्तन भजन लंगर या सह रक्तदान शिबिराचे आयोजनासह उद्या समारोपिय कार्यक्रमात आदर्श महाविद्यालयाचे प्रांगणात बाल शहिद दिवसानिमीत्य चिञफितीचे प्रदर्शन करणार आहे. त्याच बरोबर सिख संप्रदायाची पारंपारिक तलवारबाजीचेही प्रदर्शन करणार आहे. आज च्या रक्तदान शिबीरात ३५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या प्रसंगी डॉ. इंदरप्रित टुटेजा, डॉ. प्रा. लालसिंग खालसा, प्रा. अमरजित सिंग चावला, नंदु चावला,  डॉ. प्रणय कोसे यांचेसह मान्यवर उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos