चिचगाव (बरडकिन्ही) येथे पट्टेदार वाघाने केले केले ४ वर्षांच्या बालकाला ठार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / ब्रम्हपुरी : 
वन विभागांतर्गत येणाऱ्या चिचगाव (बरडकिन्ही) येथे मारोती चौकात पट्टेदार वाघाने  अवघ्या ४ वर्षांच्या बालकाला ठार केले.  सुरेंद्र देवराव ढोरे  असे मृतक बालकाचे नाव आहे.  या घटनेनंतर तणाव निर्माण झाला असून शेकडो ग्रामस्थांनी एकत्र येत गावालगतचे जंगल तोडण्याचा निर्णय घेतला. वाघाच्या हल्ल्यातील हा या वर्षांतला २७ वा बळी आहे.
  मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास सुरेंद्र ढोरे हा अंगणवाडीत शिक्षण घेणारा मुलगा मारोती चौकातून जात असताना पट्टेदार वाघाने त्याच्यावर हल्ला केला. ही घटना कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळाच्या दिशेने धाव घेतली, परंतु सुरेंद्रचा मृत्यू झाला होता. देवीदास ढोरे यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. मुलगा वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याने त्यांना जबर धक्का बसला आहे. या घटनेनंतर वन विभाग तथा पोलिसांना माहिती देण्यात आली. शेकडो ग्रामस्थ मारोती चौकात एकत्र आले. चिचगाव तसेच लगतच्या गावातील पाच लोक वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याच्या पार्श्वभूमीवर आता आम्हाला जंगल नको, आम्ही उद्यापासूनच जंगलतोड सुरू करतो, असा इशारा देत त्यांनी वन विभागाच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. मुलाचा मृतदेह रात्री उशिरापर्यंत घटनास्थळीच पडून होता.    Print


News - Chandrapur | Posted : 2018-12-26


Related Photos