मराठा आरक्षणासंदर्भात राजपत्र जारी, राज्यात १६ टक्के आरक्षण लागू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई : 
मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीस राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मान्यता दिल्यानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात आज १ डिसेंबर रोजी राजपत्र जारी केले आहे. यामुळे आजपासून राज्यात १६ टक्के मराठा आरक्षण लागू झाले असून राज्यातील एकूण आरक्षणाचे प्रमाण ६८ टक्क्यांवर पोहोचले आहे.
मराठा समाजास १६ टक्के आरक्षण देण्याच्या विधेयकास विधिमंडळाने गुरुवारी एकमुखी मान्यता दिली. यानंतर राज्यभरात आनंदोत्सव साजरा होत आहे. शुक्रवारी संध्याकाळी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी या विधेयकावर स्वाक्षरी केली होती. मराठा समाजासाठी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग निर्माण करत शिक्षण आणि नोकरीत १६ आरक्षण देण्यात आले आहे.  राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर शनिवारी राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात राजपत्र जारी केले आहे. यानुसार आजपासून राज्यात मराठा आरक्षण लागू झाले आहे.   Print


News - Rajy | Posted : 2018-12-01


Related Photos