महत्वाच्या बातम्या

 कापूस उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी विभागाची नवीन योजना : महाडीबीटीवर अर्ज करण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : राज्यातील कापूस पिकाची उत्पादकता वाढविणे, आधुनिक उत्पादन तंत्रज्ञानाचा प्रसार करणे आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे या उद्देशाने कृषी विभागाने कापूस उत्पादकता अभियान (कपास क्रांती) २०२६-२०२७ राबविण्याची घोषणा केली आहे.

या अभियानांतर्गत कापूस पीक प्रात्यक्षिके राबविण्यासाठी पात्र शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी (एफपीओ) तसेच कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्थांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

लाभार्थी निवडीसाठी निकष -
- अर्ज सादर करण्यासाठी शेतकरी गटाची नोंदणी ३१ मार्च २०२६ पूर्वी केलीली असावी.
- गटांची निवड महाडीबीटी पोर्टलवर प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य देऊन केली जाईल.
- प्रति गट कमाल २५ शेतकरी, तर प्रति गाव जास्तीत जास्त २ गट निवडले जातील.
- लाभ घेणाऱ्या शेतकरी सभासदाकडे ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी असणे बंधनकारक आहे.
- शेतकरी गट / शेतकरी उत्पादक कंपनी / कृषी क्षेत्रातील सहकारी संस्था यांनी हमिंपत्र सादर करणे आवश्यक आहे.

योजना अंतर्गत होणारे फायदे -
पीक प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुधारित वाण, एकात्मिक अन्नद्रव्य व कीड-रोग व्यवस्थापन, जल व्यवस्थापन तसेच इतर आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती दिली जाईल. यामुळे शेतकऱ्यांच्या कापूस उत्पादनात आणि उत्पादकतेत लक्षणीय वाढ होण्यास मदत होणार आहे.

कृषी विभागाकडून सर्व इच्छुक आणि पात्र शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या व कृषी क्षेत्रातील सहकारी संस्थांना महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos