एसएनडीटी महिला विद्यापीठात भारतीय वस्त्रोद्योगाच्या परंपरेपासून आधुनिकतेपर्यंतचा वेध


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबईच्या महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल, बल्लारपूर येथील फॅशन डिझाइन विभागाच्या वतीने भारतीय ज्ञानपरंपरा (IKS) विषयाचा अभ्यास करणाऱ्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींसाठी Indian Textile Industry: Antiquity to Innovation या विषयावर अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
शनिवार, १२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत गुगल मीटच्या माध्यमातून झालेल्या या व्याख्यानात वस्त्रोद्योग सल्लागार व प्राध्यापक डॉ. श्रीकांत गाडगे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. भारतीय वस्त्रोद्योगाची प्राचीन परंपरा, समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि आधुनिक नवकल्पनांचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला.
डॉ. गाडगे यांनी पारंपरिक विणकाम तंत्रे, देशी ज्ञानपरंपरा, नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर तसेच भारतीय वस्त्रनिर्मितीची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा याबाबत माहिती दिली. प्राचीन काळापासून आधुनिक तंत्रज्ञान व नवकल्पनांपर्यंत भारतीय वस्त्रोद्योगात झालेल्या परिवर्तनाचा प्रवास त्यांनी विद्यार्थिनींसमोर मांडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानसंकुलाचे संचालक डॉ. राजेश इंगोले होते. उपकुलसचिव डॉ. बाळू राठोड आणि समन्वयक डॉ. वेदानंद अलमस्त यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला प्रथम वर्षातील IKS विषय घेणाऱ्या विद्यार्थिनींसह प्राध्यापकवर्ग उपस्थित होता.
विद्यार्थिनींनी व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत भारतीय वस्त्रोद्योगाच्या प्राचीन वारशापासून आधुनिक नवकल्पनांपर्यंतचा प्रवास जाणून घेतला. कार्यक्रमाचे संचालन प्रा. प्रणाली गौरकर यांनी केले, तर निहारिका सातपुते यांनी आभार मानले.




Petrol Price




