महत्वाच्या बातम्या

 चिमुकल्याच्या बर्थडे पार्टीसाठी आणलेल्या फुग्यांचा स्फोट, बर्थडे बॉयसह तीन जण जखमी


विदर्भ न्युज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : आपल्या लाडक्या मुलाच्या बर्थडे पार्टीसाठी त्यांनी जोरदार तयारी केली. बर्थडे पार्टीसाठी हॉल बूक केला, सुपरहिरोची थीमही ठरवण्यात आले. डेकोरेशनसाठी फुगे आणले, पण हे फुगेच कुटुंबाच्या आनंदावर विरजन टाकणारे ठरले. कारमध्ये ठेवलेल्या फुग्यांचा स्फोट झाल्याने बर्थडे बॉयसह तीन जण जखमी झाले. स्फोटामुळे कारलाही आग लागली. मुंबईतल्या अंधेरी भागात ही घटना घडली.
आपल्या चार वर्षांच्या मुलाच्या बर्थडेसाठी एका कुटुंबाने अंधेरीत एक हॉल बूक केला. हॉलच्या डेकोरेशनसाठी त्या कुटुंबाने डीएन नगरमधील एका विक्रेत्याकडे ८० फुग्यांचे ऑर्डर दिले. हॉलवर बर्थडेचे जोरदार सेलिब्रेशन झाले. पार्टी संपल्यानंतर ते कुटुंब आपल्या कारने घरी जाण्यासाठी निघाले, मुलाच्या हट्टाखातर काही फुगे त्यांनी आपल्या कारमध्ये ठेवले. पण इमारतीच्या गेटवर पोहोचताच गाडीतील फुग्यांचा स्फोट होण्यास सुरुवात झाली. स्फोटामुळे गाडीलाही आग लागली आणि यात मागच्या सीटवर बसेलला चार वर्षांचा मुलगा भाजला.
फुग्यांच्या स्फोटाचे कारण स्पष्ट झाले आहे. फुग्यांमध्ये सुरक्षित मानल्या जाणाऱ्या हेलिअम गॅसऐवजी ज्वलनशील असणारा हायड्रोज वायू भरण्यात आला होता. याबाबत फूगे विक्रेत्याने कुटुंबाला कोणतीही चेतावणी दिली नसल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे.
दुर्घटनेत तीन जण जखमी झाले आहेत. चार वर्षांच्या मुलाचा चेहरा, कान आणि उजवा हात भाजला आहे. या घटनेत मुलगा इतका घाबरला आहे की, थोडासा आवाज झाला तरी तो घाबरतो असे त्याच्या आईने सांगितले.





  Print






News - Rajy




Related Photos