पॅनकार्डला ओळखपत्र म्हणून मान्यता : मोदी सरकारची मोठी घोषणा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : पॅनकार्डला आता ओळखपत्र म्हणून मान्यता मिळणार आहे, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली आहे. येत्या वर्षासाठीचे देशाचे बजेट सादर केले जात आहे.
यावेळी बोलताना निर्मला सीतारमण यांनी ही घोषणा केली. तसेच गोरगरिबांना मोफत रेशन देणार असल्याचीही घोषणा केली आहे. पुढील 1 वर्षासाठी मोफत अन्नधान्य योजना आखली जाणार आहे. त्यासाठी 2 लाख कोटींचं बजेट असेल. तसेच रेल्वेसाठी 2.40 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
News - Rajy