महत्वाच्या बातम्या

 आंतरराष्ट्रीय तृणधान्य निमीत्त आयोजित रॅलीने वेधले नागरिकांचे लक्ष


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त नागरिकांच्या आहारात ऋण धन्याचा वापर वाढवावा यादृष्टीने त्यांना प्रेरित करण्यासाठी आज सकाळी तृणधान्य रॅली तालुका कृषि अधिकारी, कार्यालय, सिव्हील लाईन्स ते जिल्हा क्रिडा संकुल पर्यंत तृण धान्याचा जागर करत आली.

2023 हे वर्ष शासनाने आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर केले आहे. तृण धान्याचे आहारात खूप महत्व आहे. आहारात त्याचा वापर करण्यासाठी नागरिकांना प्रेरीत करण्याच्या दृष्टीने आज सकाळी कृषी विभागाने आयोजित केलेल्या रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधले. उत्तम आरोग्यासाठी तृण धान्याचा आहारात वापर वाढवा, तृण धान्याचा घ्या आहार, दूर राहतील आजार.. अश्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. जिल्हा कृषी अधीक्षक अर्चना कडू यांनी या रॅलीला हिरवी झेंडी दाखवून उदघाटन केले.

या रॅलीत कृषी विभागाचे अधिकारी,प्रयोगशील शेतकरी, विध्यार्थीनी सहभाग घेतला होता. आंतरराष्ट्रीय तृणधान्य निमीत्त जिल्हा कृषि विभागामार्फत 3 ते 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.30 वाजता क्रिडा व सांस्कृतीक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. 





  Print






News - Bhandara




Related Photos