महत्वाच्या बातम्या

 वैनगंगा सहकारी साखर कारखान्याबाबत आक्षेप असल्यास सादर करा : जिल्हा प्रशासनाचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : वैनगंगा सहकारी साखर कारखाना येथील माजी कायमस्वरूपी अथवा हंगामी कामगार यापैकी कोणासही आक्षेप सादर करावयाचा असल्यास त्यांनी १५ डिसेंबर २०२३ पर्यत उपजिल्हाधिकारी महसुल यांचेकडे सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.

यासंबंधीची यादी भंडारा जिल्हा वेबसाईटवर प्रसीध्द करण्यात आली असून यादीतील कर्मचारी व त्यांचे कायदेशीर वारस यांनी बॅक खात्याचा तपशील, ओळखपत्र, रहीवासी प्रमाणपत्र तसेच मृत्यु कामगार यांचेबाबतीत वारसदारांनी वारस असल्याबाबत शपथपत्र व इतर पुरावे सादर करावे.

यासंबंधी सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली व औदयोगिक न्यायालय, भंडारा यांचेकडील वसुली प्रमाणपत्राचे आधारे संबंधित कामगाराचे तसेच मयत कामगार यांचे थकीत वेतन योग्य ती पडताळणी करून त्यांचे बॅक खात्यात जमा करण्याचे निर्देश दिलेले आहे. त्यामध्ये ७.५ टक्के व्याज आकारणी करून अदा करण्याच निर्देश आहेत.या कामी संबंधीत रक्कम अदा करणेसंबंधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेली आहे.

नियमीत कामगार एकुण ३१५ व हंगामी कामगार ३२६ असे एकुण ६४१ कामगाराचे थकीत वेतन व त्यावर ७.५ टक्के व्याज सोबतचे यादीप्रमाणे प्रारूप प्रसिध्द करण्यात येत आहे.

  Print


News - Bhandara
Related Photos