चांद्रयान-२ मधील ऑर्बिटर सात वर्ष कार्यरत राहिल


वृत्तसंस्था / बंगळुरू :  चांद्रयान-२ मधील  विक्रम लँडरशी संपर्क तुटला असला तरी ऑर्बिटर यशस्वीरित्या चंद्राभोवती भ्रमण करत आहे. ऑर्बिटरचा कार्यकाळ आधी एक वर्षाचा असणार होता पण आता ऑर्बिटर सात वर्ष कार्यरत राहिल असे इस्रोकडून सांगण्यात आले आहे. अचूकतेने झालेले प्रक्षेपण आणि मिशनच्या योग्य व्यवस्थापनामुळे ऑर्बिटरचे आयुष्य वाढवणे शक्य झाल्याचे इस्रोकडून सांगण्यात आले.
२२ जुलैला जीएसएलव्ही एमके ३ प्रक्षेपकाने ज्या अचूकतेने चांद्रयान-२ ला पृथ्वीच्या कक्षेत स्थापित केले त्याला हे श्रेय जाते असे इस्रोने म्हटले आहे. ऑर्बिटरचे आयुष्य वाढल्यामुळे चंद्रावरील खनिज, पाणी आणि अन्य गोष्टी जाणून घेता येणार आहेत. ऑर्बिटरमध्ये हाय रेसोल्युशनचा कॅमरा वापरण्यात आला आहे. त्याच्याकडून मिळणारे फोटो जागतिक वैज्ञानिक समुदायाला उपयोगी पडणार आहेत.
चंद्राच्या पृष्ठभागापासून २.१ किलोमीटर अंतरावर असताना विक्रमचा नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला. संपर्क तुटण्याच्या टप्यापर्यंत लँडरमधील सर्व सिस्टम, सेन्सर्स अत्यंत अचूकतेने काम करत होत्या. प्रत्येक टप्यातील यशाचे काही निकष ठरवण्यात आले होते. आतापर्यंत ९० ते ९५ टक्क्यापर्यंतची सर्व उद्दिष्टये पूर्ण झाली आहेत असे इस्रोकडून सांगण्यात आले.
  Print


News - World | Posted : 2019-09-08


Related Photos