महत्वाच्या बातम्या

 राज्यात जिल्हानिहाय पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : राज्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हानिहाय बदल्या झाल्या आहेत. शिंदे-फडणवीस सरकारने गुरुवारी याबाबत आदेश जारी केला. त्यानुसार धनंजय आर कुलकर्णी यांची रत्नागिरीच्या पोलीस अधीक्षक पदी, पावन बनसोड यांची सिंधुदुर्गच्या पोलीस अधीक्षक पदी, नगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक या पदावर नागपूर लाच लुचपत विभागाचे प्रतिबंधक विभागातून आलेले राकेश ओला यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच सांगली, सातारा सोलापूर या ठिकाणी सुद्धा नव्याने अधीक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून बदल्यांची चर्चा सर्वत्र सुरू होती, सरकार बदलल्यानंतर आता अखेर या बदल्यांना मुहूर्त मिळाला आहे. या अगोदर आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या होत्या त्यानंतर आता पोलीस दलातील बदल्या झालेल्या आहे.

नगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या जागी नागपूर येथून राकेश ओला यांची अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर गडचिरोली येथून सातारा पोलीस अधीक्षक पदाकरता शेख सलीम अस्लम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर नाशिक या ठिकाणाहून शिरीष सरदेशपांडे यांची सोलापूर ग्रामीण अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे तसेच नागपूर येथून सांगलीच्या आदेशक पदी बसवराज तेली यांची नियुक्ती करण्यात आली असून त्याबाबतचे आदेश आज राज्याचे सचिव व्यंकटेश भट यांनी दिलेल्या आदेशामध्ये या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

गेल्या अडीच वर्षापासून नगर जिल्हा पोलीस अधीक्षक पदी मनोज पाटील हे सोलापूर या ठिकानाहून नगर येथे रुजू झालेले होते गेल्या दोन वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी पोलीस दलातील प्रशासकीय पातळीवर अनेक कामे हाती घेतली ईटपाल सेवा ही अतिशय चांगल्या पद्धतीने राबवल्यामुळे त्यांना राज्याचे उत्कृष्ट असे पारितोषिक सुद्धा जाहीर झाले होते, दोन वर्षांमध्ये नगर जिल्ह्यामध्ये पोलीस दलातील विविध समस्यांचा त्यांनी निपटारा केला विशेष म्हणजे जिल्ह्यातील प्रलंबित असलेले 55 हजार गुन्हे हे गेल्या दहा वर्षापासून प्रलंबित होते त्याचा निपटाला करत त्यांनी ती संख्या अवघी 5000 वर आणून ठेवलेली आहे प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी होता.





  Print






News - Rajy




Related Photos