महत्वाच्या बातम्या

 पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम


- नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत १ एप्रिल ते १ मे २०२३ या कालावधीत सामाजिक न्याय पर्व राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने १४ एप्रिल २०२३ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११:०० वाजता प्रियदर्शनी सभागृह, चंद्रपूर येथे संपन्न होणार आहे. 

या कार्यक्रमाला जिल्ह्यातील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांनी केले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos