महत्वाच्या बातम्या

 २७ ते २९ जानेवारीला गोंडवाना येथे अमृत क्रीडा व कला महोत्सव आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी /  गडचिरोली : शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमधील कलागुणांना वाव देऊन त्यांच्यामध्ये खेळांप्रती उत्साह निर्माण व्हावा, याकरिता क्रीडा व शारीरिक शिक्षण तसेच विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने  विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी तसेच संलग्नित अनुदानित महाविद्यालयातील ३५० शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी २७ ते २९ जानेवारीला गोंडवाना विद्यापीठ परिसरात अमृत क्रीडा व कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवाचे २७ जानेवारीला सकाळी ११.३० वाजता विद्यापीठ परिसरात उद्घाटन होणार आहे. उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे तर प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे, स्लम सॉकर (झुंड फेम), प्रमुख उपस्थिती म्हणून प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे आणि संजय दत्ताजी रामटेके चंद्रपूर यांची उपस्थिती राहणार आहे.

२९ जानेवारीला दुपारी १२ वा. या महोत्सवाचा समारोप व बक्षिस वितरण होणार आहे. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, विशेष अतिथी म्हणून नागपूर येथिल डॉ. केदार सिंग सी.रोटेले (केड्राक) प्रमुख अतिथी म्हणून बोधी फाउंडेशन नागपूरचे ललित खोब्रागडे, प्रमुख उपस्थिती म्हणून प्र- कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, जिल्हा क्रीडा अधिकारी गडचिरोली प्रशांत दोंदल, कबड्डीपटू यवतमाळ लक्ष्मण मोतीराम पवार उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन यांनी केले आहे.

या क्रीडा व कला प्रकारात रंगणार स्पर्धा

या क्रीडा महोत्सवात क्रिकेट, व्हॉलीबॉल, रनिंग, कबड्डी, संगीत खुर्ची, खो-खो अशा विविध सांधिक स्पर्धा तर कला महोत्सवात एकल गीत, समूह आणि एकल  नृत्य, नाटिका, या स्पर्धा होणार आहेत. कर्मचारी अशा क्रीडा व कला स्पर्धामध्ये सहभागी होणार असल्यामुळे त्यांच्यात उत्साहाचे वातावरण आहे.





  Print






News - Rajy




Related Photos