उप पोस्टे दामरंचा येथे ३१ जोडप्यांचा सामूहिक विवाह मेळावा संपन्न
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी : उप पोस्टे दामरंचा येथे १६ फेब्रुवारी २०२३ रोजी पोलीस अधिक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधिक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधिक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधिक्षक येतीश देशमुख अहेरी यांचे संकल्पनेतुन व उप विभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर जिमलगट्टा यांचे मार्गदर्शनाखाली व संस्कार दीप अकॅडमी पुणे यांच्या सहकाऱ्याने उप पोलीस ठाणे, दामरंचा येथे १६ फेब्रुवारी २०२३ रोजी भव्य जन जागरण व सामूहिक विवाह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
सदर सामुहिक विवाह सोहळा व भव्य जनजागरण मेळाव्याची सुरुवात कार्यक्रमाचे आध्यक्ष ग्रामपंचायत दामरंचाची सरपंच किरण कोडापे प्रमुख पाहुणे ग्रामपंचायत दामरंचाचे सचिव पुरम, पोउपनि बावनथडे, सीआरपीएफचे ए.सी सतोषकुमार एसआरपीएफचे पोउपनि डी. ठोंबरे व गावातील प्रतिष्टीत नागरीक यांनी विर बिर्सा मुंडा यांच्या प्रतिमेचे पुजन व दिप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सदर कार्यक्रमाची प्रस्तावना उप पोस्टे दामरंचाचे प्रभारी अधिकारी राजेद्र कपले यांनी केली. कपले यांनी गडचिरोली पोलीस दला मार्फत दादालोरा खिडकी अंतर्गत विविध योजनांची माहिती देवुन त्या योजनांचा लाभ घेण्याचे आव्हान केले.
सदर कार्यक्रमात पोस्टे परिसरातील मौजा- वेलगुर जि.प.प्रा. शाळेचे विद्यार्थी व मौजा-भंगारामपेठा येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतीक कार्यक्रम, रेला नृत्य गोडी ढोल नृत्य, अधिवासी पारंपारिक नृत्य सादर केले.
सदर जनजागरण व सामुहिक विवाह सोहळ्यात पोस्टे परिसरातील मौजा- कोलसेपल्ली, पालेकसा, मांड्रा, बामणपल्ली, रुमलकसा वेलगुर, कोयागुडम, भंगारामपेठा गावातील ३१ जोडप्यांचे सामुहिक विवाह लावण्यात आले. तसेच ४५ मॅरेथॉन स्पर्धेचे फॉर्म भरुन घेतले आणि ०९ आभा कार्ड, ०७ पॅन कार्ड, ११ ई श्रम कार्ड ०१ जात प्रमाणपत्र प्रस्ताव घेण्यात आला.
सदर जन जागरण व सामुहिक विवाह मेळाव्या करिता उप पोस्टे दामरंचा हद्दितील सुमारे ९०० ते १ हजार स्त्रि-पुरुष व शाळकरी विद्यार्थी उपस्थित होते. वधु-वर यांना साडी, ड्रेस व संसार उपयोगी सामान देण्यात आले. तसेच नागरीक व विद्यार्थी यांना कपडे, धोतर, महिलांना साडी व विद्यार्थी यांना स्कुल बॅग असे, विविध प्रकारचे सामान वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन पोउपनि मैसनवाड यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थित नागरिकांना नॉनहेज जेवनाची व्यवस्ता करण्यात आली होती.
News - Gadchiroli