महत्वाच्या बातम्या

 घरासमोर उभी असलेली मोपेड चोरट्याने पळवली : राजुरा पोलिसांनी एक लाखांची दुचाकी शोधून काढली!


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : राजुरा शहरातील जवाहरनगर परिसरातून मोपेड चोरी करणाऱ्या आरोपी दीपक मारोती उमरे ३८ वर्ष, रा. मातामंदिर वॉर्ड, राजुरा, जि. चंद्रपूर याला राजुरा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्याकडून चोरीला गेलेली हिरो कंपनीची पांढऱ्या रंगाची मेस्ट्रो मोपेड, किंमत अंदाजे एक लाख रुपये, जप्त करण्यात आली. पोलीस स्टेशन राजुरा येथे याप्रकरणी गुन्हा क्रमांक ७७८/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

जवाहरनगर, राजुरा येथील गोविंदा मदत झाडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १० ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११ वाजतापासून ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घरासमोर उभी असलेली हिरो कंपनीची पांढऱ्या रंगाची मेस्ट्रो मोपेड क्रमांक एमएच ३४ बीए ३४६४ चोरून नेली. या दुचाकीची किंमत अंदाजे एक लाख रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. याप्रकरणी राजुरा पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.

चोरीच्या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला. यावेळी गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी दीपक उमरे याला जवाहरनगर परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याच्याकडून चोरीस गेलेली मोपेड जप्त करण्यात आली.

सदर कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि राजुराचे सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार सुशांत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण लोकरे, सफो. किशोर तुमराम, पोहवा संजय चौधरी, विक्की निर्वाण, अनुप डांगे, पोअं शफीक शेख, मिलिंद जांभुळे, रमेश बस्सी, गुडेराव पोले, राजीव दुबे यांनी केले.





  Print






Related Photos