कुरुड येथील बसस्थानक झाले भंगार, दुरुस्ती कधी होणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / कोंढाळा
: देसाईगंज वरून काही अंतरावर असलेल्या कुरुड हे गाव मंडई, शंकर पटासाठी व नाटकांसाठी प्रसिद्ध आहे. या गावची लोकसंख्या जवळपास १० हजार ते ११ हजार आहे. येथील बरीच जनता सुशिक्षित व सुजाण आहे. येथील बरेचसे विद्यार्थी व जनता   बाहेर जात असतात. मात्र कुरुड येथील बसस्थानची दुरावस्था झाली असून प्रवासी वाहनांची वाट पाहताना या बसस्थानकाच्या कोणताही उपयोग होताना दिसून येत नाही. 
कुरुड येथील बसस्थानकाच्या दुरवस्थेकडे  कुणीही लक्ष देत  नसल्याचे निदर्शनास येत आहे. वर्षानुवर्षे   बसस्थानक भंगार अवस्थेत आहे. वरील छतास भगदाड पडलेले  आहे.  गावातील प्रतिष्ठित नागरिकही लक्ष घालत नाही. बसस्थानकाची अवस्था बघता जणू जाहिरातींचे साधन झाले असल्याचे दिसून येते. मात्र हे जाहिरात लावणारे साधे दुरुस्तीसाठी सुद्धा हातभार लावत नाहीत. बस स्थानकास भेगा पडलेल्या आहेत. कधी काय होणार हे सांगता येत नाही. याकडे लक्ष देऊन त्वरित बस स्थानकाची दुरुस्ती करावी अशी नागरिकांची मागणी आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-09-11


Related Photos