महत्वाच्या बातम्या

 कोटगल येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानामध्ये विविध शासकीय योजनेच्या सेवांचा १ हजार ४५८ महिलांनी घेतला लाभ 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : शासनाच्या जनकल्याणकारी योजना महिलांना मिळावे हा हेतू समोर ठेवून शासन मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रम गडचिरोली तालुक्यामध्ये मौजा कोटगल येथे २७ डिसेंबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आले होते. 

सदर कार्यक्रमाचे उद्घाटक खासदार अशोक नेते, गडचिरोली- चिमूर लोकसभा मतदार संघ हे उपस्थितीत होते. सदर कार्यक्रमाला मौजा कोटगल, इंदाळा, पारडी, विसापुर, देवापूर, सोनापूर, माडेतूकूम, कनेरी, मुरखडा, नवेगाव, मुडझा व पुलखल येथील १ हजार ४५८ महिला उपस्थित होत्या. उक्त कार्यक्रमाची पूर्व तयारी ०४ डिसेंबर, २०२३ पासून महिलांकडून ऑनलाईन/ ऑफलाईन अर्ज भरून घेण्यात आले होते. 

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे दाखले, वय व अधिवास प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र, संजय गांधी योजना व श्रावणबाळ निराधार योजना, नविन व दुय्यम रेशन कार्ड, रोजगार हमी योजनेचे जॉब कार्ड वितरीत करण्यात आले. 

तसेच उमेद योजनेअंतर्गत माताई ग्रामसंघ गोगाव यांना रुपये २ लाख, गायत्री महिला ग्राम संघ, नवेगाव यांना रुपये १ लाख ५० हजार /-, यशोधरा कोटंगले, रा. नवेगाव यांना रुपये ४० हजार /-, स्वाती राऊत रा. नवेगाव यांना ४० हजार /-, उत्कर्षा रेचनकार रा. नवेगाव यांना रुपये ४० हजार /-, एकता स्व. सहाय्यता समुह, कनेरी यांना रु.७० हजार /-, आराधना स्व. सहाय्यता समुह, कनेरी यांना रु.७० हजार /-, एकता स्व. समुह कनेरी यांना रु.१ लाख ५० हजार /-, स्वप्नपुर्ती स्व. सहाय्यता समुह, कनेरी यांना रु. १ लाख ५० हजार /-, शिव स्व. सहाय्यता समुह, नवेगाव यांना रु.१ लाख ५० हजार /- असे एवढ्या रक्कमेचे धनादेश महिला बचत गटांना वितरीत करण्यात आले. 

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत सदरचे कार्यक्रमात विविध विभागामार्फत योजनांतर्गत स्टॉल लावण्यात आले व सदरचे कार्यक्रम महेंद्र गणविर, तहसिलदार, गडचिरोली यांचे अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आले असून कार्यक्रम स्थळी प्रमुख अतिथी  सुरेंद्र गोंगले, गट विकास अधिकारी, पं. स. गडचिरोली, डॉ. भारतजी खटी,  केशव निंबोड, माजी नगरसेवक, दिवाकरजी भोयर, माजी जि.प. सदस्य गडचिरोली, तेजप्रभा पंकज भोयर, उप सरपंच, ग्रा.पं. कोटगल, हेमंत मेश्राम, पोलीस पाटील, पि. एन. काळे,पशुधन विकास अधिकारी, प.सं. गडचिरोली, आर. व्हि. तलांडे, ना. तह, दिपक गुट्टे, ना. तह, डी. ए.ठाकरे, ना. तह, तहसिल कार्यालय व इतर कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार आर. पी. सिडाम, मंडळ अधिकारी, गडचिरोली यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता कु. तनुश्री टेंभुर्णे, तलाठी, कोटगल, व गडचिरोली मंडळातील तलाठी ठोंबरे, तुनकलवार, खांडरे, आडे यांनी व झेमानंद मेश्राम, कोतवाल, कोटगल व इतर कोतवाल, कन्नाके, बांबोळे, शेडमाके व टिकले यांनी परिश्रम घेतले. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानात जास्तीत जास्त महिलांनी केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या योजनेचा लाभ घेण्याबाबत महेंद्र गणविर, तहसिलदार, गडचिरोली यांनी आवाहन केले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos