महत्वाच्या बातम्या

 सात वर्षीय रफानचे रमजानच्या पवित्र महिन्यात उपवास


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वरोरा : रमजान म्हणजे बरकतीचा महिना. या पवित्र महिन्यात वरोरा शहरातील सात वर्षीय रफान बाबू शेख या बालकाने संपूर्ण महिनाभर उपवास करण्याचा संकल्प केला असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मनामनातील दरी कमी करून परस्परांमध्ये स्नेहभाव, सद्भावना वाढविणारा महिना म्हणजे रमजान चा महिना मानले जाते. संयम, त्याग, शांती चांगुलपणा, आणि प्रामाणिकपणा ठाई रुजविणारा हा पवित्र महिना. या महिन्यामध्ये मुस्लिम बांधव उपवास करतात. 

वरोरा शहरातील रफान बाबू शेख या संस्कार भारती शाळेत दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या सात वर्षीय बालकाने संपूर्ण महिनाभर उपवास करण्याचा संकल्प केला आहे. पहाटे पासून तर सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत तो सगळे वर्ज करतो. एवढेच काय तर पाणी सुद्धा त्याला चालत नाही. विशेष म्हणजे त्याने हे कडक उपवास पहिल्यांदाच ठेवले असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos