४० लक्ष रुपयांच्या विकास कामाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भुमिपूजन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : विधानसभा मतदार संघातील विविध विकासकामांचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भुमिपूजन करण्यात येत आहे. दरम्यान शहरातील पठाणपूरा गेट परिसरात रस्ता, नाली, सुशोभीकरण या ४० लक्ष रुपयांच्या कामाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भुमिपूजन करण्यात आले आहे.
यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे युवा नेते अमोल शेंडे, महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, अल्पसंख्याक विभागाचे शहर अध्यक्ष सलीम शेख, शहर संघटक विश्वजित शहा, रुपेश चहारे, विनोद अनंतवार, देवा कुंटा, नितेश गवळी, शमा काजी, शाहिन शेख, महेंद्र कांबळे, प्रदिप मडावी, बंडू देवोजवार, कुणाल कांबळे, सतीश सुर्रा, दिलीप लिंगोजवार, शैलेश दिंडेवार, डाॅ. शिल दुधे, विनोद गंपावा, राजेश भुरे, रमेश कुईटे, प्रफुल कोल्हे, रविंद्र घातोडे, मोहम्मद ईकबाल शेख, सहरोज खान, मयुर अक्केवार, विजय सिडाम, राहुल जोगी, सचिन पेटकर, प्रणय खोब्रागडे, ओनिश वडगेलवार, स्नेहा देवोजवार, विश्वजित सिंग, नागेश कताडे, योगेश जारुंडे, कमलाकर बावणे आदींची उपस्थिती होती.
चंद्रपूर मतदार संघाच्या विकासासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. यासाठी मोठा निधी त्यांनी उपलब्ध करुन दिला आहे. या निधीतून येथे विकासकामे सुरु आहे. नुकतेच आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते ११ कोटी १३ लक्ष रुपयांच्या कामाचे भुमिपूजन करण्यात आले आहे. यात विशेषत: ग्रामीण भागातील पांदण रस्त्यांच्या समावेश आहे.
दरम्यान पठाणपूरा परिसरातील ४० लक्ष रुपयांच्या विकास कामांचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भुमिपूजन करण्यात आले आहे. या सिमेंट काॅंक्रिट रोड, नाली, पेव्हर बाॅक ईत्यादी कामे करण्यात येणार आहे. सदर कामामुळे नागरिकांच्या सोयीत भर पडणार आहे.
News - Chandrapur