आज कुणबी समाजाचा महामोर्चा धडकणार गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयावर


- हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
 प्रतिनिधी / गडचिरोली
: आज २७ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता विविध मागण्यांना घेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट कुणबी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाभरातील तसेच विदर्भातील हजारो कुणबी बांधव या महामोर्चात सहभागी होणार आहेत. 
मोर्चाचे नेतृत्व जिल्ह्यातील युवक, युवती व विद्यार्थी करणार आहेत. महामोर्चाला खा. भावनाताई गवळी, खा. मधुकर कुकडे, माजी खा. नाना पटोले, आमदार बच्चू कडू, आ. सुनिल केदार, आ. बाळू धानोरकर, आ. संजय धोटे, आ. यशोमती ठाकूर, आ. परिणय फुके, आ. पंकज भोयर, माजी मंत्री संजय देवतळे, माजी आ. वामनराव चटप आदी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
कुणबी जातीचा समावेश एसईबीसी प्रवतार्गत करावा व १६ टक्के असरक्षण देण्यात यावे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी जशाच्या तशा तत्काळ लागू कराव्यात, नोकर भरती संदर्भातील पेसा अंतर्गत महामहीम राज्यपालांनी निर्गमित केलेल्या अधिसुचनेत सुधारणा करून सर्व प्रवर्गातील स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावे, कुणबी जातीच्या विद्यार्थी, विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतीगृहाची निर्मिती करून एससी, एसटी प्रमाणे सर्व अभ्यासक्रमांसाठी १०० टक्के शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात यावा, धानाला प्रती क्विंटल ४ हजार रूपये हमीभाव द्यावा, शासनाने गठीत केलेल्या जनजाती सल्लागार समितीचा अहवाल तत्काळ जाहिर करून निर्णयातील तरतूदीनुसार कार्यवाही करावी, कुणबी जातीला ऍट्रासिटी कायद्यांतर्गत संरक्षण द्यावे, कुणबी जातीतील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात यावा आदी मागण्यांचा समावेश आहे.  

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-27


Related Photos