पी.एम. किसान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांनी ३० जून पूर्वी वार्षिक ई-केवायसी KYC) पूर्ण करणे बंधनकारक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम. किसान) योजनेअंतर्गत लाभ मिळणाऱ्या सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी केंद्र व राज्य शासनाने वार्षिक ई-केवायसी (e-KYC) प्रमाणिकरण पूर्ण करणे अनिवार्य केले आहे. योजनेतील पारदर्शकता वाढवणे, गळती रोखणे आणि केवळ खऱ्या व जिवंत लाभार्थ्यांपर्यंतच लाभ पोहोचवणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. यासाठी राज्यात २० मे २०२६ पासून सर्वदूर विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
ई-केवायसी पूर्ण करण्याची अंतिम मुदत -
चालू वर्ष २०२५-२६ साठीची ही वार्षिक ई-केवायसी मोहीम ३० जून २०२६ पूर्वी पूर्ण करणे बंधनकारक आहे. विहित मुदतीत ई-केवायसी न केल्यास लाभार्थी आगामी हप्त्यांच्या लाभापासून वंचित राहू शकतात.
ई-केवायसी पूर्ण करण्याच्या पद्धती -
लाभार्थी शेतकऱ्यांना खालील दोन सोप्या पद्धतींपैकी कोणत्याही एका पद्धतीने आपले प्रमाणिकरण पूर्ण करता येईल:
१. बायोमेट्रिक पद्धत: नजीकच्या सामाईक सुविधा केंद्रावर (CSC) जाऊन बायोमेट्रिक प्रमाणीकरणाद्वारे.
२. फेस ऑथेंटिकेशन (चेहरा ओळख) पद्धत: PM-KISAN मोबाईल ॲप डाऊनलोड करून स्वतःच्या चेहऱ्याद्वारे (Face Authentication).
दिव्यांग व वृद्ध शेतकऱ्यांसाठी विशेष सुविधा -
ज्या वृद्ध किंवा आजारी लाभार्थ्यांना हालचालीसंबंधी अडचणी आहेत आणि केंद्रावर जाणे शक्य नाही, त्यांच्यासाठी गाव पातळीवरील ग्रामस्तरीय नोडल अधिकारी (VNOs) व क्षेत्रीय कर्मचारी वैयक्तिकरीत्या लक्ष देऊन फेस ऑथेंटिकेशन द्वारे ई-केवायसी पूर्ण करण्यास मदत करणार आहेत.
जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकरी बांधवांनी ३० जून २०२६ पूर्वी आपली ई-केवायसी प्रक्रिया तातडीने पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. असे जिल्हा नोडल अधिकारी पि.एम.किसान तथा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भंडारा विभागानी कळविले आहे.
News - Bhandara




Petrol Price




