महत्वाच्या बातम्या

 ऐन उन्हाळ्यात पावसाचा यलो अलर्ट : ७ एप्रिल पर्यंत अवकाळी पावसाच्या सरींचा अंदाज


विदर्भ न्यूज एक्सपेस 
वृत्तसंस्था / मुंबई : मुंबईसह राज्य भरातील जिल्ह्यांना एप्रिल आणि मे महिन्यात उष्णतेच्या लाटांचा चटका बसेल, असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला असतानाच आता ७ एप्रिल पर्यंत विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत अवकाळी पावसाच्या सरी कोसळतील अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहिती नुसार ७ एप्रिल पर्यंत राज्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. ४ एप्रिल रोजी विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली तर ५ एप्रिल रोजी गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.





  Print






News - Rajy




Related Photos