कोईलारी येथील जि.प. शाळेचा संपूर्ण भार एकाच शिक्षकावर : प्रशासनाचे दुर्लक्ष


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / सडक अर्जुनी : 
तालुक्यातील ग्रामपंचायत कोईलारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गेल्या काही दिवसांपासून एकच शिक्षक कर्तव्यावर राहत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे . मात्र प्रशासनाचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे .    
प्राथमिक शाळा कोयलारी येथील शिक्षक काही दिवसांपासून हजेरी लावत नाही, अनाधिकृतरित्या गैरहजर असून सध्या एकाच शिक्षकावर शाळेच्या संपूर्ण भार आलेला आहे. विद्यार्थ्याचे  मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच शाळेला बरोबर इमारत नाही. शाळेत सोयीसुविधांचा अभाव दिसून येत आहे.या शाळेकडे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप गावकरी करीत आहेत .   
याबाबत पंचायत समिती व गटशिक्षणाधिकाऱ्यांना वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा अजून पर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही.  तेव्हा नवीन शिक्षकाची प्रतिनियुक्ती तात्काळ करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांतून होत आहे .    Print


News - Gondia | Posted : 2018-10-27


Related Photos