महत्वाच्या बातम्या

 अवैध रित्या गोवंशाची कत्तलीसाठी नेणारे दोन ट्रक गावकऱ्यांनी केले जप्त : १०० गोवंशाची सुटका 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / कोरची : तालुक्यात मसेली कोटरा मार्गे गोवंशाची तस्करी सावली गावातील गावकऱ्यांना अवैध रित्या गोवंशाची कत्तल करण्यासाठी नेण्यात येत आहेत अशी शंका आल्यामुळे गावकऱ्यांनी गोवंश नेणाऱ्या दोन ट्रक थांबविण्यात आले. दोन्ही ट्रकांमध्ये गोवंश जनावरे क्रूरपणे बांधलेले आढळून आले. 

सदर गावामध्ये अवैध रित्या वाहतूक होत असल्याच्या संशय वाटल्यामुळे रात्री ९.०० ते ९.३० च्या दरम्यान गावकऱ्यांनी सापळा रचुन दोन ट्रकसह थांबविण्यात आले. त्यामध्ये जवळपास दोन्ही ट्रकांमध्ये १०० गोवंश आढळून आले. या दोन्ही ट्रकचे ड्रायव्हर गावातील लोकांची गर्दीमुळे फरार झाले.    

सदर घटनेची माहिती गावातील पोलीस पाटील शांतीलाल नैताम यांच्या सहकार्याने कोरची पोलीस स्टेशनला अवैध रित्या होणारी गोवंश तस्करी कळविण्यात आली. सदर घटनेचा तपास केला असता MH-४० CM.२७१२ या ट्रक मध्ये ५० तर NL.०८.D.०४०४  या वाहनात ५० असे दोन्ही ट्रकांमध्ये जवळपास १०० गोवंश किंमत १५ ते २० लाख रुपयांची गोवंश आढळून आले.
सदर गोवंश अवैध व्यवसाय करणाऱ्यांना कठोर कारवाई करून दोन्ही ट्रक जप्त करण्यात यावे, असे गावातील सर्व गावकऱ्यांनी मागणी केली आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos