प्रवाशांच्या सोयीसाठी विसापूर ज्येष्ठ नागरिक संघाचा स्तुत्य उपक्रम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : प्रवाशांना व ग्रामस्थांना मार्गाची अचूक माहिती मिळावी आणि वाहतूक सुरळीत व्हावी, या उद्देशाने बल्लारपूर तालुक्यातील विसापुर येथील ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या पुढाकारातून नांदगाव, विसापूर, बल्लारपूर आणि कोलगाव फाटा या मार्गांवर दिशादर्शक फलक बसविण्यात आले.
विसापूर व परिसरातील गावांमध्ये नव्याने येणाऱ्या वाटसरूंसह वाहनचालकांना मार्गाची माहिती मिळण्यात अनेकदा अडचणी निर्माण होत होत्या. ही बाब लक्षात घेऊन ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत हा लोकोपयोगी उपक्रम राबविला.
दिशादर्शक फलक बसविताना संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी श्रमदान करून सहभाग नोंदविला. योग्य ठिकाणी फलक उभारण्यात आल्याने परिसरातील नागरिक तसेच वाहनचालकांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे. सार्वजनिक हितासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.
यावेळी सुरेश पंदिलवार, अशोक तुराणकर, रत्नाकर टोंगे, सुरेश इटनकर, प्रभाकर कळसकर, गणेश टोंगे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपस्थितांनी सहकार्य केले.




Petrol Price




