आरमोरी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणावर आक्षेप


- उच्च न्यायालयात याचिका दाखल
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी/ गडचिरोली :
आरमोरी नगर परिषदेच्या पहिल्या निवडणूकीसाठी नगराध्यक्षपदाचे आरक्षण नुकतेच जाहिर करण्यात आले. नगराध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जमातीकरीता राखीव निघाले. मात्र या आरक्षणावर आक्षेप घेणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आल्याने आता निवडणूक लांबवण्याची चिन्हे आहेत.
आरमोरीला नगर परिषदेच्या दर्जा मिळाल्यानंतर पहिल्या नगर परिषद निवडणूकीकडे आणि नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. नगराध्यक्षपदाची माळ नागरीकांचा मागास प्रवर्ग किंवा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित होईल अशी चर्चा होती. मात्र आरक्षण सोडतीनंतर अनेकांच्या अपेक्षा भंग झाल्या. शहरात आदिवासीबहुल मतदार मोजक्याच प्रमाणात आहेत. यामुळे नाराजीचा सूर उमटू लागला. यामुळे भाजपाचे पदाधिकारी तथा माजी उपसरपंच दीपक निंबेकर यांनी या आरक्षणाला आव्हान देणारी याचिका नागपूर खंडपीठात दाखल केली आहे. या याचिकेवर १० फेब्रुवारी ला सुनावणी होणार आहे. यामुळे न्यायालयाच्या निकालापर्यंत निवडणूकीची प्रक्रिया थांबणार आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-23


Related Photos