देव्हाडा परिसरात अवैध रेती वाहतूक पकडली : ३०.३० लाखांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : करडी पोलिसांनी देव्हाडा परिसरात पेट्रोलिंग दरम्यान अवैधरीत्या रेती वाहतूक करणारा टिप्पर जप्त केला आहे. ही कारवाई ३० मे रोजी ठाणेदार गोरक्षनाथ नागलोथ यांच्या नेतृत्वाखाली पोलिस शिपाई मेश्राम व पथकाने यशस्वीपणे केली.
तपासात आरोपी कैलाश हारगु निशाने* (वय ३४, रा. नवेगाव, ता. तिरोडा) याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीच्या ताब्यातील टिप्पर (क्रमांक एमएच ३६ एए २८४५, किंमत अंदाजे ३० लाख रुपये) आणि त्या टिप्परमध्ये सापडलेली अंदाजे पाच ब्रास रेती (किंमत ३० हजार रुपये) असा एकूण ३० लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई करडी पोलिस ठाण्याचे अधिकारी स्वतः तपासत असून अवैध रेती उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी भविष्यातही अशा धडक कारवाया सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
News - Bhandara




Petrol Price




