शरीर सुखाची मागणी करणाऱ्या मुख्याध्यापकाला अटक


- आरोपीला २९ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / अकोला : 
छायाचित्र व्हायरल करतो अशी धमकी देत महिलेकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या प्रभारी मुख्याध्यापकाला अकोट ग्रामीण पोलिसांनी अटक करून शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २९ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.  सुधीर भानुदास कोलटक्के (३७)  असे आरोपीचे नाव असून तो भातकुली तालुक्यातील बोरवडी जिल्हा परिषद शाळेवर प्रभारी मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहे. 
आरोपीने एका ३५ वर्षीय महिलेला छायाचित्र व्हायरल करतो, अशी धमकी देत महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली. गजानन महाराज विहिरीवर त्याने विनयभंगही केला, अशी तक्रार पीडित महिलेने अकोट ग्रामीण पोलिसांत दिली. त्यावरून पोलिसांनी सुधीर कोलटक्के याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून अमरावती येथून अटक केली. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोनवणे, ठाणेदार मिलींद बहाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अनुराधा पाटेखेडे करत आहे.

   Print


News - Rajy | Posted : 2018-10-28


Related Photos