कुशल राजनेता व राष्ट्रभक्त महान योद्धयास देश मुकला : केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर :
महान दार्शनिक तथा अष्टपैलू व अजातशत्राू व्यक्तीत्व पूर्व प्रधानमंत्री  भारतरत्न श्रध्देय अटलबिहारी वाजपेयी यांच्या दुःखद निधनामुळे देशाने कुशल राजनितीज्ञ, तत्वचिंतक व समरसतेचा अविरत मुलमंत्रा जपणारा मातृहृदयी नेता गमावला असून अटलजींच्या निधनाने देशाची फार मोठी हानी झाली असल्याची शोक संवेदना केंद्रीय गृहराज्यमंत्री  हंसराज अहीर यांनी व्यक्त केली आहे. 
लोकसभेत प्रतिनिधीत्व करतांना अटलजींचा नेहमीच सहवास लाभला, ओजस्वी वाणी व संसदेतील त्यांची अभ्यासपूर्ण भाषणे, राष्ट्रहिताची धोरणे, अफाट निर्णयक्षमता व राष्ट्रसुरक्षेसाठी त्यांनी केलेले भक्कम कार्य देशवासीयांच्या नेहमीच स्मरणात राहिल, त्यांच्या निस्पृह, निव्र्याज व राष्ट्रसमर्पित कार्याची महती राष्ट्रासाठी अभिमानास्पद होती. त्यांच्या राष्ट्रभक्तीला सर्व समावेशक वृत्तीला जवळून बघण्याचे सौभाग्य लाभले हे जीवन सार्थकी झाल्याचा माझ्यासाठी अमुल्य क्षण होता अशा शब्दात त्यांनी आपली भावना व्यक्त करून या महान राजकीय योद्धयाच्या आत्म्यास ईश्वर शांती प्रदान करो अशी शोकात्म प्रतिक्रीया वाजपेयींच्या निधनाबद्दल ना. अहीर यांनी व्यक्त केली आहे.   Print


News - Chandrapur | Posted : 2018-08-16


Related Photos