साहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यांवर केली कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
विशेष प्रतिनिधी / अहेरी :
तालुका मुख्यालयापासून पाच  कीलोमीटर अंतरावर असलेल्या शासकीय आश्रम शाळा खमनचेरु येथील शाळा परिसराचे दोनशे मीटर अंतरावर असलेल्या तंबाखू जन्य (सुगंधीत तंबाखू) पदार्थ विक्री करीत असलेल्या पाणठेला व दुकानावर साहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधीकारी डाॅ. इंदूराणी जाखड यांचे नेतृत्वात आज धडक मोहिम राबवून सुगंधीत तंबाखू जप्त करण्यात आला. या कारवाई मध्ये तहसीलदार प्रशांत घोरुडे, नायब तहसीलदार चंद्रकांत तेलंग, पोलिस उपनिरीक्षक सुधाकर कुमरे व पथकाचे सहकार्य मीळाले.
 शाळा, महाविद्यालय परिसरातील दोनशे मीटर  अंतरावर जर कुणीही तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करीत असल्यास त्यांचेवर नियमानुसार कायदेशीर दंडात्मक कारवाई केली जाते. शासकीय आश्रम शाळा खमनचेरु लगत काही अंतरावर असलेल्या तीन पाणठेला व एक दुकानावर प्रकल्प अधिकारी डाॅ.इंदूराणी जाखड यांचे नेतृत्वाखाली आज धाडी टाकण्यात आल्या व मुद्देमाल जप्त करण्यात आला. या शाळेत शिक्षण घेत असलेल्या मुलीमध्ये तंबाखू मीश्रित खर्रा व इतर तंबाखूजन्य पदार्थाचे व्यसन लागले ही बाब लक्षात येताच याला आडा बसावा म्हणून प्रकल्प अधिकारी डाॅ.जाखड यांनी धडक मोहीम हाती घेतल्याने सुगंधी तंबाखू विक्रेत्याचे धाबे दणाणले आहे.
 
विविध उपक्रमांच्या माध्यमातून तंबाखू विषयी जनजागृती करू : डाॅ. इंदूराणी जाखड 

" आश्रम शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना कोणतेही वाईट व्यसन लागु नये म्हणून आपण जागरूक आहोत. आश्रम शाळेत शिकत असलेल्या काही मुला मुलींना सुगंधीत तंबाखू ,खर्रा खाण्याचे व्यसन असल्याने आपण विद्यार्थ्यांमध्ये  जनजागृती करण्यासाठी शाळा स्तरावर निबंध स्पर्धा व कार्यक्रम, उपक्रमाचे नियोजन करण्यात येईल. तसेच समाजामध्ये सुध्दा याची जनजागृती करण्यासाठी मुक्तीपथ यांची मदत घेतल्या जाईल तसेच कलापथक, स्लाॅईड शो व इतर कार्यक्रमाचे आयोजन करुन समाजात तंबाखू विषयी जनजागृती केली जाईल. अशी माहिती साहाय्यक जिल्हाधिकारी तथा
प्रकल्प अधिकारी अहेरी डाॅ. इंदूराणी जाखड यांनी दिली . 
   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-10


Related Photos