संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागात झुऑलॉजी सोसायटी २०२२-२३ चे उद्घाटन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागात नुकतेच झुऑलॉजी सोसायटी 2022-23 चे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे, तर प्रमुख अतिथी म्हणून उच्च शिक्षण विभागाचे माजी संचालक डॉ.के.एम. कुलकर्णी उपस्थित होते.
राज्याचे उच्च शिक्षण विभागाचे माजी संचालक डॉ. के.एम. कुलकर्णी म्हणाले की, देशाच्या प्रगती आणि उज्ज्वल भविष्यासाठी विद्याथ्र्यांनी संशोधनाकडे वळणे आवश्यक आहे. संशोधनासाठी महागडी रसायने, वातानुकुलीत अशा भव्य प्रयोगशाळा, अत्याधुनिक उपकरणे लागतात असे नाही, तर आपण निसर्ग, प्राणी, वनस्पती, त्यांचे वैद्यकीय, आयुर्वेदिक उपयोग, तसेच दैनंदिन जीवनात येणा-या समस्यां व त्यावरील उपाययोजना यावरही अगदी साध्या व सोप्या पध्दतीने संशोधन करू शकतो, त्या दृष्टीने संशोधक विद्याथ्र्यांनी पाहणे आवश्यक आहे.
अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे म्हणाले की, विद्यार्थी जीवनात स्वावलंबीपणा, चिकाटी, एकात्मता, कणखरपणा आणि आत्मविश्वास आवश्यक असून आयुष्यात येणा-या प्रत्येक आव्हानांना विद्यार्थ्यांनी सामोरे जावून समस्यांचे निराकरण करावे. विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या शैक्षणिक विभागातील सोसायटीच्या माध्यमातून भविष्य उज्ज्वल व यशस्वी होण्यासही मदत होते.
कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.विद्यार्थीनी कु. गायत्री ताडेकर व सक्षी शिंदे यांनी सरस्वती स्तवन सादर केले. विभाग प्रमुख डॉ. एच.पी नांदुरकर व प्रा. व्ही.के.नागले यांनी मान्यवरांचे स्वागत केले. याप्रसंगी सोसायटीच्या पदाधिका-यांची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी कु. रचना धुरे, तर उपाध्यक्षपदी कु. प्रतिभा भोयर हिची निवड करण्यात आली. प्रास्ताविकातून डॉ. एच.पी. नांदुरकर यांनी झुऑलॉजी सोसायटीचा उद्देश व महत्व सांगितले. सूत्रसंचालन कु. श्रृतिका क्षीरसागर हिने, तर आभारप्रदर्शन तेहरीन शेख यांनी केले. कार्यक्रमाला अमरावती शहरातील विविध महाविद्यालयांमधील विद्याथ्र्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.
News - Rajy