विदर्भ- मराठवाड्यात १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : आजपासून पुढील पाच म्हणजे २९ फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण विदर्भात ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. २५ ते २७ फेब्रुवारीपर्यंत वादळी पावसासह गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
दरम्यान, आज विदर्भ व मराठवाड्यातील १३ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. नागपूरसह भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अमरावती या पाच जिल्ह्यांमध्ये तीव्रता अधिक राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतातील काढणीला आलेल्या पिकांचे योग्य नियोजन करावे असा इशाराही देण्यात आला आहे.
विदर्भ मराठवाडा वगळता उर्वरित राज्यात बहुतांशी ढगाळ वातावरण राहणार आहे. तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. पावसाच्या शक्यतेमुळे विदर्भ व मराठवाड्यात गराठा वाढला असून तापमानाचा पारा घसरला आहे.
कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट :
आज २५ फेब्रुवारी : मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड तर विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट आहे.
उद्या २६ फेब्रुवारी : परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात पावसासह गारपीटीची शक्यता आहे.
२७ फेब्रुवारी रोजी मराठवाड्यातील हिंगोलीसह संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
News - Rajy