महत्वाच्या बातम्या

 परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांजवळ आढळली काँपीची झेरॉक्स


- भरारी पथकाने केली कारवाई

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : आजपासून जिल्ह्यात दहावीच्या परीक्षा शांततेत सुरु झाल्या. परिक्षेच्या पहिल्याच दिवशी एका केंद्रावर विद्यार्थ्यांजवळ काँपीची झेरॉक्स आढळून आली. भरारी पथकाच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर विद्यार्थ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

दहावीच्या लेखी परीक्षेला आज सुरुवात झाली. जिल्ह्यामध्ये १५ हजार ९२४ विद्यार्थी परिक्षेला प्रविष्ठ झालेले आहे. त्यापैकी १२ हजार ५२२ विद्यार्थ्यांचा आज मराठी या विषयाचा पेपर दिला तर २९४ विद्यार्थी अनुपस्थित होते. कॉपीचा प्रकार होऊ नये यासाठी बैठे पथकदेखील केंद्रावर नियुक्त करण्यात आले आहे.

अजिंठा विद्यालय, रामनगर येथे माध्यमिकचे उपशिक्षणाधिकारी यांच्या पथकाने भेट दिली असता एका खोलीमध्ये विद्यार्थ्याजवळ काँपीची झेरॉक्स आढळून आली. त्यामुळे पथकांनी विद्यार्थ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, असे माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos