दुचाकी पुलाच्या कठड्यावर आदळून एक ठार , एक गंभीर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर :
कळमना - किन्ही मार्गावर दुचाकी पुलाच्या कठड्याला आदळून झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना आज ९ डिसेंबर रोजी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली.
मनोज सुरज पवार (२६) असे मृतकाचे नाव आहे. या अपघातात अमिन नसीम अन्सारी शेख (२२) हा गंभीर जखमी झाला आहे. एमएच ३१ एन ९९६६ क्रमांकाच्या वाहनाने मनोज आणि अमिन शेख हे दोघे जण जात असताना वळणावरील पुलाच्या कठड्याला दुचाकीची धडक बसली. यामध्ये मनोज पवार हा जागीच ठार झाला. जखमी शेख याला चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले आहे. दोघेही बल्लारपूर येथील आंबेडकर वार्डातील रहिवासी होते. ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. रूग्णालयात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

   Print


News - Chandrapur | Posted : 2018-12-09


Related Photos