वन्यप्राण्यांच्या अवयवांची तस्करी व विक्री करणाऱ्या आरोपींना अटक
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : गोंदिया जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या अवयवांची तस्करी व विक्री करणाऱ्या पाच आरोपीना नवेगांव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील अधिकारी व पोलीस विभाग यांनी 26 फेब्रुवारी 2023 रोजी अटक केली.
गोंदिया जिल्ह्यातील शामलाल ढिवरू मडावी, दिवारू कोल्हारे, मानिक दारसू ताराम, अशोक गोटे, रविंद्र लक्ष्मण बोडगेवार यांना अटक केली असून असून त्यांच्या कडून वन्यप्राण्याचे 2 दात, 1 नख, अस्वलाचे 3 नखे, रानडुक्कर सुळे 10, चितळाचे 1 शिंग, सायाळ प्राण्यांचे काटा, खवल्या मांजराचे खवले 2, ताराचे फासे, जिवंत मोर 1, मोराचे पिसे 5 बंडल, रानगव्याचे 1 शिंग, जाळे, सुकलेले हाडे, रक्त पापडी, सुकवलेले मास, देशी दारू पेटी, 21 लाख 49 हजार 440 रूपये जप्त करण्यात आले. आरोपींच्या विरोधात वन्यजीव संरक्षण कलामांन्वये वनगुन्हा नोंदविण्यात आला, असे उपसंचालक नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र साकोली येथील पवन जेफ यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
News - Bhandara