महत्वाच्या बातम्या

 एका अठरावर्षीय पिडीतेचा विनयभंग केल्या प्रकरणी घाटंजी जिटिव्हीचे वार्ताहर संजय ढवळे यास उच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन मन्जूर


- २५ हजार रुपयाच्या वैयक्तिक हमीपत्रावर अन्तरीम जामीन 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
अयनुद्दीन सोलन्की / घाटंजी : घाटंजी तालुक्यातील एका औद्योगिक प्रशिक्षण शिक्षण संस्थेत, शिक्षण घेत असलेली एका १८ वर्षीय पिडीतेचा विनयभंग केल्या प्रकरणी संशयित आरोपी घाटंजी येथील जिटिव्हीचे वार्ताहर संजय ढवळे विरुद्ध अपराध क्रंमाक ०३४२/२०२६, १३ एप्रिल २०२६ रोजी भारतीय न्याय संहिता कलम ७४, ७५ व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ कलम ३ (|) (w) (|) (||) अंतर्गत घाटंजी पोलीस ठाण्यात विनयभंग व ॲट्रोसीटी ॲक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, संशयित आरोपी संजय ढवळे यांनी ॲड. जयंत ठाकरे (यवतमाळ) यांच्या मार्फत यवतमाळ येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. यु. बघेले यांच्या न्यायालयात अटकपुर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. दरम्यान, सदर प्रकरणाची सुनावणी, २७ एप्रिल २०२६ रोजी झाली. सदर प्रकरणात आरोपीचे वकील ADV. शाम कापरेकर यांनी युक्तिवाद केला. मात्र, अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. यु. बघेले यांनी आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता.

दरम्यान, यवतमाळच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने सन्शयीत आरोपी सन्जय ढवळे याचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळल्याने, नन्तर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खन्डपिठात ADV. ए. एस. बन्ड यान्च्या मार्फत उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. सदर प्रकरणात शासकीय अधिवक्ता ADV. बी. एन. लोणारे व आरोपीचे वकील ADV. ए. एस. बन्ड यांनी युक्तीवाद केला. आरोपीच्या वकीलाचा युक्तीवाद ग्राह्य धरून सन्शयीत आरोपी सन्जय ढवळे याचा तात्पुरता जामीन अर्ज उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती वाय. जी. खोब्रागडे यांनी मन्जूर केला आहे.

सदर प्रकरणाचा पुढील तपास पांढरकवडा येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी राॅबिन बन्सल करित आहे. 

घाटंजी तालुक्यातील एक १८ वर्षीय पिडीता ही  घाटंजी येथे ५/६ महिण्यापासून भाडयाने राहत होती. तिच्या सोबत आणखी तिचे तीन मैत्रीणी सुद्धा तेथे भाडयाने राहत होते. संशयित आरोपी जिटीव्हीचे वार्ताहर संजय ढवळे हा एक दिवसाआड त्या १८ वर्षीय पिडीतेला भ्रमणध्वनी करुन जेवन झाले कां? अभ्यास झाला कां? मोटार सुरू केली आहे, असे म्हणत होता. पिडीता ही काका या नात्याने घर मालकाशी बोलत होती. 

अठरावर्षीय पिडीता ही ११ एप्रिल २०२६ रोजी आपल्या गावी असतांना तिला घर मालकाचा मेसेज आला की, माझ्या घराच्या रुमला कलरींग करायचे आहे. त्यामुळे १८ वर्षीय पिडीता ही गांवावरून रुमवर आली. सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान संशयित आरोपी संजय ढवळे हा कलर घेऊन रुम मध्ये गेला. त्यांनी रुम मधील एका भिंतीला कलर मारला. त्याच वेळी संशयित आरोपी संजय ढवळे हा त्या १८ वर्षीय पिडीतेच्या बेडवर बसुन माझा पाय दुखत आहे, थोडासा पाय दाबुन दे, असे पिडीतेला म्हटले. विशेष म्हणजे वार्ताहर संजय ढवळे याला पिडीता ही काका सारखे समजत असल्याने त्याचे पाय दाबुन दिले. त्या नंतर तिच्या खांद्यावर हात टाकून छेडछाड करुन तिचा विनयभंग केला. 

उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती वाय. जी. खोब्रागडे यांनी खालील आदेश पारीत केला आहे. सदर प्रकरणाची पुढील सुनावणी २६ जुन २०२६ रोजी होत असुन, सन्शयीत आरोपी सन्जय ढवळे यास २५,००० रुपयाच्या वैयक्तिक हमीपत्रावर २ सक्षम जामीनदारासह अन्तरीम जामीनावर सोडण्यात यावे. दोषारोपपत्र दाखल होई पर्यत घाटन्जी पोलीस स्टेशनच्या हद्दी बाहेर परवानगी शिवाय जाता येणार नाही. ०८ मे २०२६ रोजी सकाळी १०.०० ते १२.०० या वेळेस तपास अधिकारी यांच्या समक्ष हजर होऊन जामीनपत्र सादर करावे. प्रत्येक सोमवारी सकाळी १०.०० ते १२.०० वाजता तपास अधिकारी यांचे समक्ष हजर राहावे. तसेच फिर्यादीच्या साक्षीदारास धमकी देऊ नये अथवा छेडछाड करु नये, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहे.

सदर प्रकरणाचा तपास पांढरकवडा येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उप विभागीय पोलीस अधिकारी राॅबिन बन्सल हे करित आहे.





  Print






News - Rajy




Related Photos