महत्वाच्या बातम्या

 राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सोमवार 27 फेब्रुवारी सुरू होत आहे. हे अधिवेशन 25 मार्च पर्यंत असणार आहे. या अधिवेशनात सन 2023-24 चा अर्थसंकल्प गुरुवार, 9 मार्च रोजी सादर केला जाणार आहे.

विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत त्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.

अधिवेशनाची सुरुवात सोमवार 27 फेब्रुवारी रोजी राज्यपालांच्या अभिभाषणाने होणार आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये यापुढे प्रत्येक अधिवेशनात पहिल्या दिवशी वंदे मातरम तर  नंतर जय जय महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्राचे राज्य गीत वाजवण्यात येणार आहे.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवीवर्षानिमित्त अभिवादनाबाबतचा ठराव दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे. तसेच जागतिक महिला दिनानिमित्त 8 मार्च रोजी दोन्ही सभागृहात याबाबत विशेष चर्चा होईल. अर्थसंकल्पावर तीन दिवस तर अर्थसंकल्पीय मागण्यावर सहा दिवस चर्चा करण्यात येणार आहे. विधेयकांपैकी प्रस्तावित विधेयके (मंत्रीमंडळाची मान्यता प्राप्त) 5 आणि प्रस्तावित विधेयके (मंत्रीमंडळाची मान्यता अपेक्षित) 8 अशी अंदाजे 13 विधयके या अधिवेशनात मंजुरीसाठी मांडली जाणार आहेत. दोन्ही सभागृहातील कामकाजासंदर्भात सविस्तर चर्चा यावेळी करण्यात आली.





  Print






News - Rajy




Related Photos