साईआश्रया अनाथलयातील पहील्याच अनाथ मुलीला मिळाले हक्काचे घर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / शिर्डी :
येथिल साईआश्रया या अनाथलयातील पहील्याच मुलीचा विवाह मोठ्या थाटात  संपन्न मला. गणेश दळवी यांनी या साईआश्रयाची सुरवात केली.  अनाथ,निराधार, वंचित व बेघरांसाठी साईआश्रयाची सुरुवात केली. ८१ मुले साईआश्रय घेत आहेत.  अशीच ३ वर्षापूर्वी शिर्डी पोलीसांना निराधार मनोरुग्न मुलगी रस्त्यावर फिरत असताना दिसून आली होती.  तिला साईआश्रयात दाखल करण्यात आले होते. या मुलीची काळजी गणेश दळवी यांनी घेउन योग्य उपचार तीच्यावर  करण्यात आले. तिला   ज्योती असे नाव देण्यात आले होते.  हळूहळू तिच्यात चांगल्या प्रकारची सुधारणा होत गेली.   ती मानसिक आजारपणातून पुर्ण पणे बरी झाली.  जवळ जवळ २ वर्षा नंतर तीची स्मरणशक्ती पुन्हा परत आली.  साईआश्रयात कशी आली त्याबाबत सर्व सत्यपरिस्थितीची माहीती तीला देण्यात आली.  काही फोटो दाखवण्यात आले.  तेव्हा तीच्या डोळ्यातले अश्रु वाहू लागले.  तीला समजुन सांगीतले तुझा पुन्हा जन्म झाला आहे तो रडण्यासाठी नाही आम्ही सर्वजण तुला काही कमी पडू देणार नाही.  तुला एवढा मोठा साईआश्रय परिवार मिळाला आहे. तिचा पुर्ण इतिहास जाणुन घेतला तु मुस्लिम समाजाची आहे असे सांगीतले तेंव्हा तीला समजून सांगीतले.  शेजारी काही मुस्लिम समाज बांधव राहत असल्याने  तीला कुराण वाचण्यासाठी तेथे पाठवत असे . नंतर तिने रमजान चे उपवास पकडले . आम्ही धर्म पाळण्यासाठी तिच्यावर  कुठल्याही प्रकारचे बंधन ठेवले नाही . तिचे नाव ही बदलून नाजिया असे ठेवले . आपल्या मुळे कुणाच्या ही धर्माला ठेच लागता कामा नये साईबाबांनी सबका मालिक एक या संदेशाप्रमाने सर्व धर्म समभाव जपला पाहीजे असे नेहमी मुलांना सांगीतले जाते.   अशाप्रकारे एक वर्षे निघुन गेले आणी चांगल्या प्रकारे तिच्यात बदल झाला.  सज्ञान झाल्यावर तिचा विवाह करण्याचे ठरवले.  यावेळी शिर्डीतील मुस्लिम समाज बांधवांना सांगीतले की  साईआश्रयात  तुमच्या समाजाची मुलगी आहे.  तेंव्हा तिच्या साठी योग्य स्थळ असल्यास सुचवा.   भारतरत्न डॉ. ए पी.जे.अब्दुल कलाम सेवाभावी संस्थेचे संचालक मंडळ यांनी सामुदायिक विवाह चे आयोजन  २४ नोव्हेंबर रोजी केले होते.  मेहमुद भाई सय्यद ,सरदार पठान,लतिफ शेख,अनिस पठाण,अन्सार शेख,दादाभाई इनामदार, अशरफ भाई सय्यद, अन्सार शेख, दादाभाई इनामदार, अलीमभाई तांबोळी, सलीम शेख, आमुन मामुन पठाण या सर्वांनी या मुलीचा विवाह जमवण्याकामी खुप तळमळीने सहभाग घेतला.  तसेच या मुलीसाठी शेजारीच असलेले फारुक हमीद शेख यांच्या मुलासाठी स्थळ घेउन हे सर्व मुस्लिम समाज बांधव २२ नोव्हेंबर रोजी  साईआश्रयात आले.   आश्रमातर्फे सर्वांचे स्वागत केले. मुलाचे कुटुंब परिचयाचे आसल्याने मुला - मुलीची पसंती समजल्या नंतर मुलगी डोळ्यासमोर सुखाने राहील ही खाञी झाली.  दोघांचा विवाह जुळला आणि अवघ्या तिन दिवसात लग्नाची तयारी केली.  वडील या नात्याने मुलगी नाजिया साठी गणेश दळवी यांनी सर्व जवाबदारी पार पाडली.   थाटामाटात मुलीचा विवाह  पार पाडला.    Print


News - Rajy | Posted : 2018-11-27


Related Photos