महत्वाच्या बातम्या

 वर्षा पटेल यांच्या वाढदिवसा निमित्त नमाद महाविद्यालयात ७०० विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : गोंदिया शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा वर्षा प्रफुल पटेल यांच्या वाढदिवसा निमित येथील नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयात मार्गदर्शक प्रफुल पटेल, सचिव राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात प्राचार्या डॉ. शारदा महाजन यांच्या नेतृत्वात नमाद महाविद्यालय आणि बजाज सेंट्रल हॉस्पिटल गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने विध्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबिरात ७०० विद्यार्थी व कर्मचार्‍यांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली. सोबतच यावेळी विध्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोज़न करण्यात आले होते.

गोंदिया शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा वर्षा प्रफुल पटेल यांचा १६ फेब्रुवारी हा वाढदिवस. गोंदिया शिक्षण संस्था द्वारा संचालित येथील नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयात बजाज सेंट्रल हॉस्पिटल गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षा पटेल यांच्या वाढदिवसा निमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. गोंदिया शिक्षण संस्थेचे संचालक निखिल जैन यांच्या हस्ते केक कापून आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बजाज सेंट्रल हॉस्पिटलचे डॉ. एल. एल. बजाज, डॉ. ओम बघेले, डॉ. निशांत करवाडे, डॉ. विधी तिरपुडे, डॉ. अनिल आटे आणि डॉ. वैभव तुरकर सोबतच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शारदा महाजन उपस्थित होत्या.

निखिल जैन यांनी शिक्षणासोबतच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या प्रफुल पटेल यांच्या परिवाराचे आभार मानले. फेब्रुवारी महिना आमच्यासाठी खास असून गोंदिया शिक्षण संस्थेच्या समस्त पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यासांठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. पटेल परिवाराप्रति कृतज्ञता म्हणून गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात विध्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर नमाद महाविधालयात आयोजित करण्यात आले असून गोंदिया शिक्षण संस्था द्वारा संचालित अन्य महाविधालयामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती निखिल जैन यांनी दिली.

डॉ. एल. एल. बजाज, डॉ. ओम बघेले, डॉ. निशांत करवाडे, डॉ. विधी तिरपुडे, डॉ. अनिल आटे आणि डॉ. वैभव तुरकर यांनी तपासणीसाठी नोंदणी केलेल्या सुमारे 700 विधार्थी आणि कर्मचाऱ्यांची तपासणी केली. यावेळी विध्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोज़न करण्यात आले. मान्यवरांनी सांस्कृतिक कार्यक्रम स्थळाला भेट देऊन विध्यार्थ्यांचे मनोबल वाढवले. अशा कार्यक्रमातूनच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होत असल्याचे सांगितले.

प्राचार्या डॉ.शारदा महाजन यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिर व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.भावेश जसानी, डॉ. राकेश खंडेलवाल, डॉ. अर्चना जैन, डॉ. शफीउल्ला खान, डॉ. गिरीश कुदळे, डॉ. मुनेश ठाकरे, डॉ. अश्विनी दलाल, प्रा. योगेश भोयर, डॉ. विराज वेलतुरकर, डॉ. अंबादास बाकरे, प्रा. उर्विल पटेल, डॉ. सुयोग इंगळे, डॉ. कपिल चौहान, डॉ. सुनील जाधव आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.





  Print






News - Gondia




Related Photos