महत्वाच्या बातम्या

 शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहात निरोप व सत्कार समारंभ संपन्न


- गृहपाल पंकजकुमार ढवळे यांना निरोप; पोलीस दलात निवड झालेल्या शिवाजी दुर्वाचा सत्कार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : स्थानिक शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह क्रमांक २, गडचिरोली येथे आज २९ मे २०२६ रोजी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वसतिगृहाचे गृहपाल माननीय पंकजकुमार ढवळे यांचे स्थानांतरण (बदली) झाल्याने त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून, वसतिगृहातील विद्यार्थी शिवाजी दुर्वा याची महाराष्ट्र पोलीस (SRPF) मध्ये निवड झाल्याबद्दल त्याचा टाळ्यांच्या कडकडाटात जाहीर सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गृहपाल पंकजकुमार ढवळे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून गृहपाल परमानंद तागडे, रवींद्र भांडेकर आणि प्रवीण मडावी हे उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान गृहपाल पंकजकुमार ढवळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करून सहकारी कर्मचारी व विद्यार्थ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. तसेच त्यांनी स्पर्धा परीक्षा व भविष्यातील आव्हानांना कसे सामोरे जावे, याबाबतचे अनुभव विद्यार्थ्यांसोबत शेअर केले. याप्रसंगी  प्रवीण मडावी यांच्यासह विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून ढवळे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, तसेच पोलीस दलात निवड झालेल्या शिवाजी दुर्वाचे कौतुक करून त्याचे अभिनंदन केले.

या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन वसतिगृहातील कर्मचारी वृंद आणि विद्यार्थी मित्रपरिवार यांनी केले होते. कार्यक्रमाचे सुबक संचालन अभिषेक कोडाप याने केले, तर उपस्थितांचे आभार करण आत्राम याने मानले. कार्यक्रमाला वसतिगृहातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos