गोंदिया नगर परिषदेचा सर्व्हेअर एसीबीच्या जाळ्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया :
बक्षिसपत्र करून दिलेल्या घराचे वारसदार  म्हणून नोंद करण्याकरीता १०  हजार रूपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी गोंदिया नगर परिषदेचा सर्व्हेअर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे.
अशोक लालमोहन गजभिये (५८)  असे लाचखोर सर्व्हेअर चे नाव आहे. त्याच्याविरूध्द गोंदिया पोलिस ठाण्यात   गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार हे सिंधी कालोनी गोंदिया येथील रहवासी असुन घर तक्रारदाराची पडआजी हीचे नांवे असून सदर घर तक्रारदार यांचे वडील व काका यांचे नांवे बक्षिस पत्र केले होते. तक्रारदार यांचे वडील व काकाचे नांव सदर घराचे वारसान म्हणून नोंद करण्याकरीता तक्रारदार यांनी नगर परिषद गोंदिया येथे काही दिवसापूर्वी अर्ज केला होता. सदर अर्जावर काय कारवाई झाली हे   विचारण्याकरीता नगर परिषद गोंदिया येथील सव्र्हेअर  गजभिये यांना भेटले असता त्यांनी तुमचे काम  खुप किचकट असून ते काम करण्याकरीता तक्रारदारास  12 हजार रूपये  लाचेची मागणी केली. तक्रारदारास  सव्र्हेअर  अशोक   गजभिय यांनी मागणी केलेली लाच रक्कम देण्याची मुळीच इच्छा नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, भंडारा येथे तक्रार नोंदविली. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, भंडारा तर्फे आज ९ आॅक्टोबर  रोजी सापळा कार्यवाही  आयोजीत केली असता सापळा कार्यवाही दरम्यान सर्व्हेअर  अशोक   गजभिये   याने तक्रारदारास वरील कामाकरीता तक्रारदाराकडुन  १२   रू लाचेची  मागणी करून तडजोडअंती  १०  हजार रूपये लाचरक्कम स्विकारली. यावरून आरोपीविरूध्द पो. स्टे. गोंदिया शहर येथे कलम ७ (अ) लाचलुचपत प्रतिबंधकायदा (सुधारीत) अधिनियम २०१८  अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला  आहे. सदर  कार्यवाही    पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, पोलीस निरीक्षक  प्रतापराव भोसले, पो. ना. गौतम राऊत, सचिन हलमारे, अश्विनकुमार गोस्वामी, पराग राऊत, चालक दिनेश धार्मिक  यांनी केली आहे.

   Print


News - Gondia | Posted : 2018-10-09


Related Photos