चौडमपल्ली महाकाली मंदिर परिसरात मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी लाईट्सची करून दिली व्यवस्था


- भाविकांनी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे मानले आभार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / आष्टी : भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चामोर्शी तालुक्यातील आष्टी- आलापल्ली मार्गावरील चौडमपल्ली येथून दोन किमी अंतरावर जंगल परिसरात स्थानापन्न असलेल्या महाकाली मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते नवसाला पावणारी म्हणून येथील देवी भाविकांची श्रद्धास्थान असल्याने भाविकांची चौडमपल्ली जंगल परिसरात असलेल्या महाकाली मंदिरात नवरात्र मध्ये यात्रेचे स्वरूप येते.
या शिवाय वर्षभर भाविकांची रिघ या मंदिराकडे लागली असते. नवरात्र सणाच्या दुर्गाष्टमीला नवसाला पावणाऱ्या महाकाली देवीच्या दर्शनासाठी अनेक ठिकाणाहून शेकडो भाविक पायी येत असतात. या मंदिर परिसरात दररोज महाराष्ट्रासह तेलंगणा, छत्तीसगड, आंध्रप्रदेश आदी राज्यातील भाविक दर्शनासाठी येत असतात. आपल्या सुखासाठी देवीकडे साकडे घालतात. या देवीचे दर्शन घेणाऱ्या शेकडो भावीकांच्या मनोकामना पूर्ण होत असल्याने या पंचक्रोशीत ही देवी प्रसिद्ध आहे.असे असतानाही या मंदिराला टिनाचे शेड टाकण्यात आले आहे. मंदिर व परिसराच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत आहे. मंदिराचे बांधकाम व्हावे, अशी इच्छा भाविकांकडून बोलली जात आहे. परंतु या मंदिर परिसरात भाविकांकरिता मूलभुत सुविधा नसल्याने भाविकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. काही भाविकांचे या ठिकाणी मनोकामना पूर्ण होत असल्याने सामुहिकरित्या बांधकाम करण्यास सहकार्य करीत आहेत. परंतु या ठिकाणी वनविभागाच्या अडथळ्यामुळे बांधकामाला अजूनही सुरुवात झाले नाही. विशेष म्हणजे चौडमपल्ली महाकाली मंदिर हे चपराळा अभारण्यांतर्गत येत असल्यामुळे या परिसरात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ सुरू असते. त्यामुळे वनविभागाने भाविकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
यासर्व भाविकांच्या अडचणी लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी भाविकांना सायंकाळी अंधारात कार्यक्रमाची गैरसोय होऊ नये, यासाठी सौरऊर्जावर चालणाऱ्या लाईट ची व्यवस्था करून दिली आणि महाकाली मंदिर परिसरात सौरऊर्जावर चालणारे लाईट लावण्यात आले. यामुळे या ठिकाणी लाईटची व्यवस्था झाल्याने भाविकांची होणारी गैरसोय टळली असल्याने अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे भाविकांनी आभार मानले.
News - Gadchiroli