गडचिरोली जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजातील तरुणांकरीता पोलीस भरती पुर्व परिक्षा प्रशिक्षण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली  :
  " पोलीस शिपाई भरती पुर्व परिक्षा प्रशिक्षण योजनेअंतर्गत " गडचिरोली जिल्ह्यातील मुस्लिम, बौध्द, ख्रिश्चन, शिख, पारसी आणि जैन या अल्पसंख्यांक समाजातील इच्छूक उमेदवारांना शासनामार्फत विनामुल्य पोलीस शिपाई भरती पुर्व परिक्षा प्रशिक्षण राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
अल्पसंख्यांक समाजातील इच्छूक उमेदवारांनी पोलीस शिपाई भरती पुर्व परिक्षा प्रशिक्षण निवड चाचणीसाठी दिनांक १९ नोव्हेंबर ला सकाळी ११ वाजता पोलीस मुख्यालय (परेड मैदान) गडचिरोली येथे आवश्यक सर्व कागदपत्राच्या छायांकीत प्रतीसह उपस्थित राहावे.
 प्रशिक्षणार्थीचे वार्षिक , कौटुंबिक उत्पन्न रुपये २. ५०  लाख पेक्षा जास्त नसल्याचा दाखला असावा.  उमेदवार अल्पसंख्यांक समाजातील असावा. वय १८-२८ वयोगटातील आवश्यक आहे. उंची पुरुषाकरीता १६५ से.मी. व महिलाकरीता १५५ से.मी. , छाती पुरुषाची ७९ सेमी (फुगवून ८४ सेमी) असावी. शिक्षण १२ वी इयत्ता उत्तीर्ण असावा. उमेदवारांनी शैक्षणिक अर्हता, आधार कार्ड, अल्पसंख्यांक असल्याचा पुरावा ईत्यादी कागदपत्राच्या सत्यप्रती अर्जासोबत देणे आवश्यक राहील.  उमेदवार शारिरीकदृष्ट्या निरोगी व सक्षम असावा.
निवडलेल्या उमेदवारांना एकूण दोन महिने प्रशिक्षण दिले जाईल.  या दरम्यान दररोज तीन तासाचे वर्ग प्रशिक्षण व दोन तासांचे मैदानी प्रशिक्षण देण्यात येईल.  निवडलेल्या प्रत्येक प्रशिक्षणार्थीस प्रशिक्षणादरम्यान मैदानी प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण संस्थेमार्फत चहापान व अल्पोपहार देण्यात येईल.  मैदानी प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण संस्थेमार्फत चहापान व अल्पोपहार देण्यात येईल.  निवडलेल्या प्रत्येक प्रशिक्षणार्थीस गणवेश साहित्यासाठी रुपये एक हजार  (१०००/-) एवऐ एकरकमी अनुदान देण्यात येईल.  निवडलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणा दरम्यान निवासाची व्यवस्था स्वत: करावी लागेल.  अशी माहिती एका पत्रकान्वये  जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-11-16


Related Photos