महत्वाच्या बातम्या

 व्यक्तिमत्व विकासासाठी प्रत्येकाने खेळाला प्राधान्य दिले पाहिजे : खासदार रामदास तडस


- छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नूतन स्पोटिंग क्लब दहेगावं (गावंडे) व सेवा फौंडेशन पुलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : आजची मुले टीव्ही इंटरनेट व मोबाईल बघण्यात वेळ घालवत असतो, त्यामुळे त्यांचा शारिरीक व मानसिक विकास होत नाही, आपले शरीर मन आणि मनगट मजबूत होण्याकरिता मैदानी खेळांना प्राधान्य दिले पाहिजे. त्यामुळे मन प्रसन्न होऊन आनंदी जीवन जगता येईल. व्यक्तीमत्व विकासासाठी प्रत्येकाने खेळाला प्राधान्य दिले पाहिजे, प्रत्येक खेळामध्ये हार जीत ठरलेली असते, पराजयातून यशाचे शिखर गाठता येते, त्याकरिता खेळाडूंनी खिलाडू वृत्ती अंगीकारुन खेळाचा आनंद घेतला पाहिजे असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.

दहेगावं (गावंडे) येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नूतन स्पोटिंग क्लब दहेगावं (गावंडे) व सेवा फौंडेशन पुलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन खासदार रामदासजी तडस साहेब यांच्या हस्ते पार पडले, त्यावेळी प्रामुख्याने जिल्हाध्यक्ष भाजपा सुनील गफाट, महामंत्री महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चा संजय गाते, सेवा फौंडेशनचे अध्यक्ष मंगेश गाते, दहेगांवच्या सरपंच राजश्री गावंडे कार्यक्रमाचे आयोजक संघटन महामंत्री भाजयुमो गौरव गावंडे, प.स. सदस्य, हेमचंद रंगारी, माजी नगरसेवक नागपूर मधु घाटे, महामंत्री भाजपा वर्धा तालुका गजानन दूतारे, माजी सरपंच सुधाकर गावंडे, कोषाध्यक्ष भाजयुमो वर्धा जिल्हा ज्ञानेश्वर कुंभारे, सुरेश नागपुरे, सुमित ढोणे, ईश्वर खोब्रागडे, रामा चैधरी उपस्थित होते.

जिल्हास्तरीय कबड्डीस्पर्धेमध्ये वर्धा जिल्हयातील प्रत्येक तालुक्यातील कबड्डी टीमांनी सहभाग घेतला, यावेळी सुनील गफाट, संजय गाते, मंगेश गाते, सरपंच राजश्री गावंडे यांनी समायोजित मार्गदर्शन केले. 

कार्यक्रमाचे प्रास्तावीक आयोजक गौरव गावंडे यांनी केले. संचालन प्रज्वल बोरकर यांनी व आभार प्रदर्शन शुभम माजरखेडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आशिष गावंडे, विवेक गावंडे, संदीप नानटकर, मंगेश पाटील, अक्षय गावंडे, लोकेश दरने, अमन वासे, विकास बोरकर, अक्षय खोब्रागडे, तन्मय दूतारे, शिवम चिखलकार, आदित्य गावंडे, अवि ठाकरे, प्रतीक गावंडे, अथर्व गावंडे, वृशिकेश माजरखेडे, सुधीर राऊत, रोशन चैधरी, वैभव चैधरी, लक्ष्मण चैधरी, प्रांजल गावंडे, ओम  गावंडे, साहिल उईके, तुषार भलावी, पवन गावंडे, आदित्य मुंजेवार, अथर्व किटे, अजिंक्य चिखलकार, सुजल चैधरी, प्रणय बोरकर, प्रेम बोरकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला  खेळाडू, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Wardha




Related Photos